⚜️उतारा वाचन भाग ५⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ५⚜️

   जनसेवा हिच ईश्वरसेवा मानणाऱ्या बाबा आमटे, मदर तेरेसा, ताराबाई मोडक या
आधुनिक संतांनी मानवतेची महान शिकवण समाजाला दिली. संतांची शिकवण ही 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' अशीच असते. ती सार्वकालिक व सार्वजनिक असते. त्यातील तत्त्वे अनादी अनंत असतात. कालप्रवाहात समाज बदलतो; पण सत्य, सदाचार, सेवा नीती, चारीत्र्य, मानवता, कर्मयोग, व्यवहार, प्रेम, बंधुभाव, दीनदुबळ्यांची सेवा ही संतांची तत्त्वे त्रिकालाबाधित व अविनाशी राहतात. असे हे संत म्हणजे खरोखरच समाजाचे सच्चे मार्गदर्शक आहेत.
 
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) कोणकोणत्या संतांनी समाजाला मानवतेची महान शिकवण दिली ?
२) संतांची शिकवण कशी असते ?
३) कोणाची शिकवण सार्वकालिक व सार्वजनिक असते ?
४) संतांच्या शिकवणीची तत्त्वे कशी असतात ?
५) कालप्रवाहात कोण बदलतो ?
६) संतांची तत्त्वे कोणकोणती आहेत ?
७) संतांची तत्त्वे कशी राहतात ?
८) समाजाचे सच्चे मार्गदर्शक कोण आहेत ?
९) 'सत्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
१०) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?
११) वरील उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा.
(१२) वरील उताऱ्यात कोणते बोधपर वाक्य आले आहे ? 
१३) तुम्हांला माहित असलेल्या संतांची नावे लिहा
१४) संतांमधील कोणते गुण तुमच्यात असावे असे तुम्हांला वाटते?
१५) 'संतांची महती' यावर पाच ओळी माहिती लिहा.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421