⚜️झाडे⚜️
झाडे जमिनीत उगवतात. झाडे उंच वाढतात. झाडांना पाने येतात. झाडे आपल्याला सावली देतात. फुले, फळे देतात. पक्षी झाडावर घरटी बांधतात. आंबा, पेरू, नारळ, वड अशी अनेक प्रकारची झाडे असतात. झाडे आपल्याला फळे देतात. लाकूड देतात. फुले, पाने देतात. सावलीही देतात. झाडे दिवसा सूर्यप्रकाशात आपले अन्न तयार करतात. झाडांची मुळे मातीची धूप होऊ देत नाहीत. झाडांमुळे पावसाळ्यात माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. आपल्याला परिसरात अनेक झाडे दिसतात. सगळी झाडे एकसारखी नसतात. मुळे, खोड, पाने, फुले, फळे हे झाडाचे मुख्य भाग आहेत. काही झाडांना काटेही असतात. काही झाडे उंच असतात. काही मध्यम उंचीची तर काही ठेंगणी असतात.