⚜️उतारा वाचन भाग ३⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ३⚜️

     आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व दिले होते. तुळस, वड, पिंपळ यांची ते पूजा करत असत. त्यांनी तुळस, बेल, दुर्वा, धोत्रा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते. वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटिस लागणारे धन नाही. म्हणूनच सरकारणे वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे. मध्यप्रदेश राज्यातील सहा जिल्हयांची जमीन गवत व जळाऊ लाकडाच्या लागवडीखाली आणली आहे. सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत.

⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.


१) आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात कशाला महत्त्व दिले होते ? 
२) आपल्या पूर्वज कशाची पूजा करत असत ?
३) आपली राष्ट्रीय संपत्ती कोणती ?
४) भारत सरकारने कोणता राष्ट्रीय सण मानलेला आहे ?
५) कोणत्या राज्यातील जमीन गवत व जळाऊ लाकडाच्या लागवडीखाली आणली आहे ?
६) सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत कशासाठी प्रयत्न होत आहेत ? 
७) 'वृक्ष' या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत ? 
८) वरील उताऱ्यात कोणत्या वृक्षांचा उल्लेख आला आहे ?
९) 'ओहोटी' या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
१०) वनांचे फायदे लिहा.
११) वृक्षसंवर्धन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल ?
१२) तुम्हांला आवडणाऱ्या झाडांचे चित्र काढा. 
१३) तुमच्या आजुबाजुला असणाऱ्या झाडांची नावे लिहा.
१४) झाडांविषयी असणारे दोन घोषवाक्य सांगा.
१५) 'झाड' या विषयावर पाच वाक्य लिहा.



⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421