⚜️विद्याधन मूल्यशिक्षण⚜️

 ⚜️विद्याधन मूल्यशिक्षण⚜️

⚜️खालील ओळींतून जाणवणारे शैक्षणिक मूल्य ओळखा.

⚜️उत्तरसूची⚜️

१) हा देश माझा, मी देशाचा, 
स्वाभिमान ठेवू मनी, 
सण राष्ट्रीय करू साजरे, 
गाऊ वीरांची गाणी..
उत्तर:- राष्ट्रभक्ती

२) धर्म तुझा, धर्म माझा, 
दोन्ही आहेत महान, 
मैत्री करू, आदर राखू, 
गाऊ ऐक्याचे गान.
उत्तर:- सर्वधर्मसहिष्णुता

३) करितो जे काम, दिसो त्यात गान, 
यावे सकळां, स्वच्छतेचे भान.
उत्तर:- श्रमप्रतिष्ठा

४) दादा असो वा ताई, 
बाबा असोत वा आई, 
संधी कोणतीही असो, 
भेदभाव मुळीच नाही.
उत्तर:- स्त्री-पुरुष समानता

५) लोकगीते सांगतात, 
महती आपुल्या प्रांताची, 
संकटकाळी धावून जाता, 
घडे प्रचिती एकात्मतेची.
उत्तर:- राष्ट्रीय एकात्मता

६) प्रगती करूया देशाची, 
कास धरूनी विज्ञाढनाची,
सकारात्मक दृष्टी ठेवून, 
निर्मिती करूया साहित्याची
उत्तर:- वैज्ञानिक दृष्टिकोन

७) हाक मारी जो संकटी, 
हात त्याला दे तुझ रें, 
खरी सेवा हीच आहे, 
नेत्री आसू दाटू दे रे.
उत्तर:- संवेदनशीलता

८) नम्रतेने ज्ञानाचा 
आरंभ, गर्वाने शेवट होई, 
समानतेने सहकार्याने, 
सदाचाराने करू शिष्टाई.
उत्तर:- सौजन्यशीलता

९) गेलेली वेळ, आलेली संधी, 
पुन्हा पुन्हा येत नाही, 
सचोटी अन् नियोजनाशिवाय, 
यश कधीही मिळत नाही
उत्तर:- वक्तशीरपणा

१०) चित्रे काढू, चित्रे रंगवू, 
नाही कामे ही उगाची, 
सुंदर लिहू, सुंदर होऊ, 
पूर्वतयारी ही लिहिण्याची.
उत्तर:- नीटनेटकेपणा

================================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421

=================================