⚜️हावरट भूत⚜️

⚜️हावरट भूत⚜️

   खूप वर्षां पूर्वीची गोष्ट आहे एक रामपूर नावाचे गाव होते आणि त्या गावांमध्ये बरेच लोक गुण्यागोविंदाने राहत होते.गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची छोटी छोटी घरे होती. प्रत्येक जण महिन्याला येणारे सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरे करीत असत.
    एप्रिल महिना होता मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवाचा दिवस होता. हा सण उत्साहात साजरा करण्याचे सर्व गावकऱ्यांनी मिळून ठरवले. गुढीपाडव्याच्या दिवशी जवळपास प्रत्येक घरात गोड गोड श्रीखडं आणि गरमागरम पुऱ्यांचा बेत ठरलेला असतो. 
    गावात विद्याताई म्हणून एक गृहिणी राहत असत. विद्याताईंनी ठरवले की आज आपणही गरमागरम पुरी आणि श्रीखंड करू. दुपार झाली आणि प्रत्येकाच्या घरातनू गरमागरम चविष्ट जेवणाचा खमंग सुवास दरवळू लागला विद्याताईंनी ही चूल पेटवली होती आणि त्या गरमागरम पुऱ्या तळत होत्या, इतक्यात त्यांच्या खिडकी मध्ये एक हात आला. त्यांना समजले की कोणीतरी आपल्या कडे पुरी मागत आहे त्यांनी त्या हातावर एक पुरी ठेवली. तो हात होता एका भुताचा आणि त्याने ती पुरी गट्टम केली परत त्याने हात पुढे केला असं करता करता चार पाच वेळा झाले.  शेवटी वैतागून विद्याताईंनी त्याच्या हातावर चुलीतील निखारा ठेवला जसा निखारा ठेवला, भुताच्या हाताला चटका बसला आणि तो पळून गेला.

तात्पर्य :- अति लोभ नाशाला कारणीभूत ठरतो.