⚜️उतारा वाचन भाग ४०⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ४०⚜️ 

  एकदा एका जंगलात मुंगी आणि टोळ राहत होते. टोळ दिवसभर आरामात पडून राहत असे तसेच त्याला गिटार वाजवायला आवडत असे. पण मुंगी दिवसभर कष्ट करायची. ती बगीचाच्या कानाकोपऱ्यातून अन्नाचे कण गोळा करुन आणायची. तेव्हा टोळ मस्त आराम करत असायचा. गिटार वाजवत असायचा किंवा झोपलेला असायचा. टोळ दररोज मुंगीला विश्रांती घेण्यास सांगायचा पण मुंगी नकार देऊन कामाला लागायची. लवकरच हिवाळा आला. दिवसरात्र थंडी पडू लागली. थंडीमूळे खूप तुरळक प्राणी बाहेर पडत असत. टोळ अन्न शोधत राहिला आणि पूर्णवेळ उपाशी राहिला, पण मुंगीकडे मात्र हिवाळा संपेपर्यंत निश्चित पणे पुरेल इतका पुरेसा अन्नसाठा होता.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) जंगलात कोण कोण राहत होते ?
२) टोळ दिवसभर काय करीत असे ?
३) टोळाला काय करायला आवडत असे 
४) मुंगी दिवसभर काय करायची ?
५) टोळ दररोज मुंगीला काय घेण्यास सांगायचा ?
६) लवकरच कोणता ऋतू आला ?
७) प्राणी घराबाहेर का कमी पडू लागले ?
८) टोळ पूर्णवेळ भूकेला का राहिला ?
९) मुंगीकडे पुरेसा अन्नसाठा का होता ?
१२) वरील उतारा मोठ्याने वाचा.
१०) वरील उताऱ्यातील अनुस्वारयुक्त आलेले शब्द लिहा. 
११) वरील उताऱ्यात कोणत्या दोन सजीवांची नावे आली आहेत ?