⚜️उतारा वाचन भाग १७ ⚜️
मोती अंगणात खेळत होता. त्याची सावली अंगणात पडली होती. मोती पळाला की, सावली पळायची. मोती थांबला कि सावली थांबायची. मोतीला खूप मजा वाटली.
⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) अंगणात कोण खेळत होते ?
२) सावली केव्हा पळायची ?
३) मोती कोठे खेळत होता ?
४) मोतीची सावली कोठे पडली होती ?
५) कोण पळाल्यावर सावली पळायची ?
६) मोतीला मजा का वाटली?
७) मोत्याची सावली का थांबायची ?
८) कोणाला मजा वाटली ?
९) वरील उताऱ्यात मोती म्हणजे कोण आहे ?
१०) तुला आवडणाऱ्या प्राण्यांची नावे सांग.
११) 'माझा आवडता प्राणी या विषयावर पाच ओळी लिही.
१२) कुत्रा कसा आवाज काढतो ?
१३) तुम्हांला कुत्रा आवडतो का ?
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421