⚜️बाग⚜️
बाग हे लहानांचे तसेच मोठ्यांचेही आवडीचे ठिकाण असते. फुलांची, फळांची, शोभेची आणि सावली देणारी झाडे असतात. ही झाडे नेटक्या पद्धतीने लावलेली असतात. बागेत हिंडण्यासाठी चांगले रस्ते केलेले असतात. बसण्यासाठी बाके किंवा बांधलेले कट्टेही असतात. काही बागेत मऊ गवताची छान हिरवळ वाढवलेली असते. बागेत वेगवेगळी फुले उमललेली असतात. फुलांमुळे बागेत फुलपाखरे येतात. मोठ्या झाडांमुळे पक्षी येतात. मुलांसाठी खेळणीही असतात. अशा वातावरणामुळे बागेत येणाऱ्याचे मन प्रसन्न होते.