⚜️उतारा वाचन भाग २५⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग २५⚜️


  चंपक डोंगरगावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे . चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. तो मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांनी मदत केली. चंपकने हिरा बागेजवळ केळीची गाडी उभी केली. 

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) चंपक कोठे राहायचा ?
२) चंपकचे गाव कसे होते ?
३) चंपकच्या मामांचे नाव काय होते ?
४) चंपकचे मामा कोठे राहायचे ?
५) चंपक कोठे शिकायला गेला ?
६) कोण शिकून मोठा झाला ?
७) चंपकला काय करायला आवडायचे ?
८) चंपकने कोणाची परवानगी मिळवली
९) चंपकला कोणी मदत केली ?
१०) चंपकने केळीची गाडी कोठे उभी केली ?
११) केळीची गाडी कोणी उभी केली ?
१२) चंपकने हिराबागेजवळ कशाची गाडी उभी केली ?
१३) चंपकमध्ये कोण कोणते गुण आहेत असे तुम्हांला वाटते ?