⚜️उतारा वाचन भाग ४५⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ४५⚜️

   विज्ञानाने जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. सुख चैन यामध्ये अमर्याद वाढ झाली आहे. आकाशाला भीडू पाहणाऱ्या उंच इमारती डोके चक्रावून टाकणारी उपकरणे हे सर्व पाहिल्यावर विज्ञा नाचा सार्थ अभिमान वाटतो. विज्ञानाने मानवी जीवनाचे बाह्यअंगच बदलून टाकले. विज्ञानेने शहरामध्ये सुधारणेचे शिखर गाठले. तेथेच एका बाजूला घाणीचा सागर अथांग व अमर्याद पसरला आहे. जीवन जगण्याच्या साध्या सुविधापासून मानवजात वंचित राहिली आहे. परीवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून केली पाहिजे. मानव परीवर्तनशील आहे. 

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) जगाचा चेहरा मोहरा कोणी बदलून टाकला आहे ?
२) कशात अमर्याद वाढ झाली आहे ?
३) विज्ञानाने कोणाचे बाह्यअंगच बदलून टाकले आहे ? 
४) शहरामध्ये सुधारणेचे शिखर कोणी गाठले ?
५) विज्ञानाने कशाचे शिखर गाठले ?
६) घाणीचा सागर कसा पसरला आहे ?
७) मानवजात कोणत्या सुविधांपासून वंचित राहिली आहे ?
८) कोण परीवर्तनशील आहे ?
९) कशाची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून केली पाहिजे ?
१०) 'परीवर्तन 'या शब्दाचा अर्थ सांग.
११) 'सागर' या शब्दाचे समानार्थी शब्द लिही.
१२) वरील उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिही.