⚜️उतारा वाचन भाग ३३⚜️
वयाच्या १५ व्या वर्षी शंकररावांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक उपकरण बनवले. बराच वेळपर्यंत चार दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असे. बालपणापासून शंकररावांची स्वाभाविक प्रवृत्ती शास्त्रीय आणि कलाकौशल्यांकडेही होती. शाळेतील घोकंपट्टीचा त्यांना मनस्वी कंटाळा होता. इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. इंग्लंडला बरीच वर्षे राहिल्यावर भिसे अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांनी 'ऑटोमिडिन' (अॅटोमिक आयोडीन) या गुणकारी औषधाचा शोध लावला. पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला. अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले. डॉ. भिसे यांनी सुमारे २०० शोध लावले.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) शंकररावांनी वयाच्या १५ व्या वर्षी कोणते उपकरण बनवले ?
२) बालपणापासून शंकररावांची स्वाभाविक प्रवृत्ती कशी होती ?
३) शंकररावाना कशाचा मनस्वी कंटाळा होता ?
४) इंग्लडवरुन भिसे कोणत्या देशात गेले ?
५) इंग्लंडमध्ये भिसे यांनी कोणत्या क्षेत्रात अनेक शोध लागले ?
६) अमेरीकेत शंकररावांनी कोणत्या गुणकारी औषधाचा शोध लावला ?
७) 'ऑटोमिडिन' या औषधाचा सैनिकांवर कधी उपयोग करण्यात आला ?
८) कोणत्या देशात ऑटोमिडिन हे औषध लोकप्रिय झाले ?
९) संशोधकांची चित्रे जमा करून तुमच्या वहीत चिकटवा.
१०) डॉ. भिसे यांनी किती शोध लावले ?