⚜️उतारा वाचन भाग १८⚜️
५ जूनला पर्यावरण दिन असतो. दरवर्षी आमच्या गावात पर्यावरण दिन साजरा करतात. सरपंचानी गावात मोठी सभा घेतली. सभेत जयश्रीने भाषण केले. जयश्री म्हणाली, "झाडे लावा. झाडे जगवा. झाडे तोडू नका, झाडे वाढवा. झाडे वाढली तर पाऊस पडेल. पाऊस पडल्याने शेती पिकेल. चारापाणी भरपूर मिळेल. "भाषण चांगले झाले. सर्व गावकऱ्यांनी एकेक झाड लावून ते वाढवण्याचा दृढ निश्चय केला. सरपंचांनी जयश्रीला पुस्तक बक्षीस दिले.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) पर्यावरण दिन कधी असतो ?
२) गावात कोणी सभा घेतली ?
३) सभेत कोणी भाषण केले ?
४) जयश्रीस बक्षीस का दिले ?
५) काय वाढली तर पाऊस पडेल ?
६) सभा का बोलवण्यात आली होती ?
७) झाडे का लावावीत ?
८) गावकऱ्यांनी कोणता दृढ निश्चय केला ?
९) सरपंचांनी जयश्रीला काय बक्षीस दिले ?
१०) जयश्रीला कोणी बक्षीस दिले ?
११) ५ जूनला कोणता दिन असतो ?
(१२) झाडांचे फायदे सांगा.
(१३) तुम्हांला आवडणाऱ्या झाडांची नावे लिहा.
१४) झाडांवर आधारीत दोन घोषवाक्ये लिहा.
१५) झाडाचे चित्र काढा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421