⚜️उतारा वाचन भाग १ ⚜️
⚜️उतारा वाचन भाग १ ⚜️
'हास्य' माणसाची सहजप्रवृत्ती आहे. माणसाला आपल्या दुःखाचा निचरा करण्यासाठी 'हास्य' हा रामबाण उपाय सापडलेला आहे. म्हणूनच 'माणूस' म्हणजे हसणारा प्राणी. ही माणसाची व्याख्या योग्यच ठरते. हे हास्य विनोदामूळे निर्माण होते, म्हणून तर मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) माणसाची सहजप्रवृत्ती कोणती ?
२) माणसाला आपले दुःख घालवण्यासाठी कोणता रामबाण उपाय सापडला आहे ?
३) माणसाची कोणती व्याख्या योग्य ठरते ?
४) हास्य कशामूळे निर्माण होते ?
५) मानवी जीवनात कशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ?
६) आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता शब्द वरील उताऱ्यात आला आहे ?
७) वरील उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा..
८) विनोदामूळे तुम्हाला होणारे फायदे सांगा.
९) तुम्हांला आवडणारा एखादा विनोद सांगा.
१०) 'रामबाण' या शब्दात कोणत्या व्यक्तीचे नाव आले आहे ?
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421