⚜️उतारा वाचन भाग २४⚜️
एक होती आजी, चिरीत होती भाजी भाजी चिरली खसाखसा, तांदूळ धुतले पसापसा भाजी शिजली रटारटा, मुलं जेवली रटारटा मुलं गेली खेळायला, धावायला नि पळायला खेळून खेळून दमली, घरी येऊन झोपली.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) आजी काय करत होती ?
२) आजीने तांदूळ कसे धुतले ?
३) जेवण झाल्यावर मुलांनी काय केले ?
४) मुले का दमली ?
५) भाजी कशी शिजली ?
६) वरील कवितेतील शेवटचे अक्षर समान असणारे शब्द शोधा व लिहा.
जसे आजी भाजी
७) एकच शब्द दोन वेळा येऊन तयार झालेले शब्द शोधा व लिहा.
जसे खसाखसा -
८) खेळून खेळून कोण दमले ?
९) मुले घरी येऊन का झोपली ?
१०) छान अक्षरात कविता हा लिहा.