⚜️उतारा वाचन भाग २३⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग २३⚜️

  इंग्रज समुद्रावरुन बोटीने मुंबईत येऊन व्यापार करु लागले. त्यांना मुंबईचा समुद्रकिनारा आवडला. इंग्रजांनी मुंबई बंदरात सुधारणा केल्या. मोठे बंदर बांधले. व्यापार वाढविला. व्यापार वाढता वाढता इतका वाढला की, आता मुंबई हे भारतातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र आहे. सगळ्या जगातून मुंबई बंदरात बोटीने माल येतो आणि सगळ्या जगात बोटीने माल जातो.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) बंदर कोणी बांधले ?
२) इंग्रजांना कोणता समुद्रकिनारा आवडला ?
३) भारतातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र कोणते आहे ?
४) वरील उताऱ्यात आलेले जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.
५) बोटीने मुंबईत कोण आले ? 
६) इंग्रजांनी कोणत्या बंदरात सुधारणा केल्या ?
७) सगळ्या जगातून कोणत्या बंदरात बोटीने माल येतो?
८) वरील उताऱ्यात आलेले जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.
९) खालील ठिकाणाला काय म्हणतात ?
जसे जहाज थांबण्याचे ठिकाण बंदर
तसे १. बस थांबण्याचे ठिकाण
      २. रेल्वे थांबण्याचे ठिकाण
      ३. विमान थांबण्याचे ठिकाण
      ४. विद्यार्थी शिकण्याचे ठिकाण