⚜️उतारा वाचन भाग १५⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग १५⚜️

       चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजबाजूला खूप खूप पसरला होता. फांदीफांदीवर पानेच पाने होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करुन बोलायचा आणि फडफड करुन रागवायचा.

 ⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

(१) गावाचे नाव काय होते ?
(२) गावाजवळ काय होता ?
(३) ओढ्याजवळ काय होते ?
(४) ओढ्याजवळील झाडाचे नाव काय होते ?
(५) कोण उंच उंच वाढला होता?
(६) वरील उताऱ्यात वडेशचे वर्णन कसे केले आहे ?
(७) झाडाची सावली कशी होती?
(८) झाडावर कोणकोणते पक्षी यायचे? 
(९) झाडावर पक्षी येऊन काय करायचे ?
(१०) वडेशला कोणाची भाषा समजायची ?
(११) वडेश पारांशी कसा बोलायचा ?
(१२) वडेश कोणावर रागवायचा ?
(१३) वडेश राग कसा व्यक्त करायचा ?
(१४) वडेशची पाने कशी होती ?
(१५) आभाळाला कोण भिडला होता ?
(१६) गोड गाणी कोण गायचे ?
(१७) तुम्हांला माहित असलेल्या पक्ष्यांची नावे लिहा.
(१८) वडेश म्हणजे कशाचे झाड आहे ?
(१९) 'सळसळ' यासारखे आणखी शब्द लिहा.
(२०) 'फडाफड' यासारखे आणखी शब्द लिहा.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421