⚜️उतारा वाचन भाग २७⚜️
एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते. जाई, जुई, कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कण्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी! पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) फुलांचे संमेलन कोठे भरले होते ?
२) फुलांचे संमेलन कोणत्या वेळेत भरले होते ?
३) सगळीकडे कोणत्या फुलांची वर्दळ होती ?
४) कोणती फुले आनंदी दिसत होती ?
५) कोण शांत बसले होते ?
६) कोण स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता ?
७) कमळ का डोलत होते ?
८) कोणाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते ?
९) फुलपाखरांना कोणी आमंत्रित केले होते ?
१०) वरील उताऱ्यात कोणकोणती फुले आली आहेत ?
११) तुम्हांला कोणकोणती फुले आवडतात ?
१२) फूल आणि फूलांचा रंग अशी यादी तयार करा.