⚜️उतारा वाचन भाग ५७⚜️
कुंदाताई नि मुकुंदराव दोघेही नोकरी करतात. तात्या नि माई घरात लक्ष देतात. दुसरीत जाणारा राजू खूप गोड मुलगा आहे. छोट्या चिकिला तर आजी आजोबांचा फारच लळा. राजूनं एक कुत्र्याचं पिल्लूही आणलय. कुत्र्याचं पिल्लू सदा इकडून तिकडं बागडत असतं. घराभोवतालची छोटी, सुंदर बाग सदा हसत असते.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) नोकरी कोण करतात ?
२) घरात लक्ष कोण देतात ?
३) राजू कसा मुलगा आहे ?
४) आजी-आजोबांचा लळा कोणाला आहे ?
५) कुंदाताई व मुकुंदराव काय करतात ?
६) चिकिला कोणाचा लळा आहे ?
७) राजूने काय आणले आहे ?
८) सदा कोण हसत असते ?
९) राजू कितवीत शिकतो?
१०) इकडून तिकडे कोण बागडत असते ?
११) वरील उताऱ्यात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला आहे ?
१२) वरील उताऱ्यात कोणता पिल्लूदर्शक शब्द आला आहे ?
१३) 'बाग' या शब्दाला आणखी समानार्थी शब्द लिही.
१४) उताऱ्यात कोणती विरामचिन्हे आली आहेत ?
१५) 'माझे कुटुंब' या विषयावर पाच ओळी लिही.