⚜️उतारा वाचन भाग ४२⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ४२⚜️

   आरोग्य ही संपत्ती आहे. सुदृढ शरीर ही मानवाला लाभलेली सर्वांत महत्त्वाची देणगी आहे. ‘sound mind in sound body' आसे म्हटले जाते. तन तंदुरुस्त, तर मन स्वस्थ व शांत शरीर व मन दोन्हीही आरोग्य संपन्न असली तर 'असाध्य ते साध्य करुन दाखवता येते. तारुण्यात एखादया व्यसनाचा अतिरेक झाला तर सर्वनाशच ओढवतो. सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. तारुण्यातील 'विद्यार्थी दशा' ही अवस्था फार खडतर ! आहार - विहारावर ताबा ठेवावा लागतो व आरोग्य सांभाळावे लागते. तारुण्यात मन अतिशय चंचल आणि संवेदनशील असते. विदयार्थ्यांला प्रलोभनांपासून दूर राहून अभ्यासावर मन एकाग्र करावे लागते. तरच त्याला आयुष्यात ज्ञान संपादन करता येते. अशा नाजूक, तरल वयात जर तरुणाला एखादे व्यसन लागले तर त्याच्या आयुष्याचे मातेरे होते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) आपली संपत्ती कोणती ?
२) मानवाला लाभलेली सर्वांत मोठी देणगी कोणती ?
३) आयुष्यात असाध्य ते साध्य कधी करून दाखावता येते ?
४) सर्वनाश कधी ओढवतो ?
५) तारुण्यातील कोणती अवस्था फार खडतर असते ?
६) मन अतिशय चंचल व संवेदनशील कधी असते ?
७) विद्यार्थ्यांला ज्ञान कधी संपादन करता येते ?
८) आयुष्याचे मातेरे कधी होते ?
९) 'व्यसनांचे दुष्परिणाम 'पाच- सहा ओळीत माहिती लिहा. 
१०) 'व्यसनांचे दुष्परिणाम' यावर आधारीत घोषवाक्ये तयार करा.