⚜️प्रेरणादायी विचार⚜️
- गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात.
- कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल राग व्यक्त करत असेल तर आपण फक्त शांत रहायचे कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते.
- स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीच नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते.
- शोधण्यात गेलं सार आयुष्य आता कळलं की स्वतः पेक्षा चांगला सोबती कोणी नाही. जे दूर गेल ते विसरायचं, आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं.
- पैसा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही.
- मी आहे म्हणुन सगळे आहेत या ऐवजी सगळे आहेत म्हणुन मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
- जपणं आणि साठवणं, यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणस.
- जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिच श्रीमंती आहे.
- प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
- निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते . रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो. दु:ख पचले नाही तर नैराश्य वाढत जाते.
- कोणाच्या प्रभावात जगू नका की, कोणाच्या अभावात जगू नका. हे जीवन तुमचे आहे. तुमच्याच स्वभावात जगा.
- प्रेम बालपणी फुकट मिळते, तरूणपणी कमवावे लागते, आणि म्हातारपणी मागावे लागते, हीच जीवनाची वस्तुस्थिती आहे.
- घरासमोरील गाड्या आणि रूबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की, समजून जा ...हे घर श्रीमंताचं आहे!
- जीवनात कुणी कितीही तिरस्कार, षड़यंत्र केले तरी आपण चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतून निघणाऱ्या धूरात आकाशाला काळे करायच सामर्थ्य नसतं.
- दुबळ्यांची शिकार करून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो.
- व्यक्तिमत्व असे घडवा की, कोणीही आपल्यामागे वाईट बोलले तरी ऐकणा-याला ते खोटं वाटल पाहिजे.
- शिक्षण कुठुनही प्राप्त करता येतं परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळतात.
- हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही.
- आनंद हा एक भास आहे. ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दु:ख हा एक अनुभव आहे, जो प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.
- किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात रहावं लागतं.
- जीवनात तुम्हाला कधी ना कधी तरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं. कधी कधी आपल्याकडे जे आहे, तेच पुरेसं असतं, पण याची जाणीव वेळेत होणही खूप गरजेचं असतं, कारण अपेक्षांचं चक्र हे कधीच थांबत नसतं काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही.
- आपण सत्याबरोबर चालायचे. एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल फक्त परिश्रम घेताना.....नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करीत रहायचे.
- जीवन जगत असतांना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्विकार करा.....कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते.
- प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणुसकीची किल्ली असली पाहिजे.
- माणूसच माणसांचे औषध आहे. कोणी दुःख देतो तर कोणी आनंदी बनवून जातो.
- कोणी आपल्याशी कसे का वागेना, आपण चांगलचं वागायचं !! थोडं कठीण असलं तरी अशक्य निश्चितच नाही....यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असुद्या...एकदम नाही होणार, पण मनाने ठरवलं व प्रयत्न केला तर निश्चितच जमेल..!
- बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो जेव्हा पैश्यांच्या जोरावर गाढवं पुढे जातात.
- लोभाणे जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा माणुसकिने जवळ येणाऱ्या लोकांना जपा. आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.
- जे तुम्हाला मिळालं नाही ते तुमच्या मुलांना मिळावं यासाठी अट्टाहास करण्यापेक्षा, जे तुम्हाला कोणी शिकवलं नाही, ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. कारण वस्तू काळानुसार नष्ट होऊन जातात पण ज्ञान हे आजन्म सोबत राहते आणि ते नेहमी कामी येते.
- विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणून नेहमी चांगले सकारात्मक व प्रेरणादायी विचार मनात आणावेत आणि समाधानी रहावे.
- माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची.
- मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, ते माझ्या जवळचे, ते माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर सर्व जवळचे असून सुध्दा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे.
- प्रगती करत असताना अंगी मेहनत आणि धाडस असायला हवं. त्यासाठी वेगळ काही करण्याची गरज नाही. बेधडक आणि प्रामाणिक पणे मेहनत केली की प्रगती नक्कीच होते.
- गैरसमज हा खुप मोठा आजार आहे, याची लागण होण्यापुर्वीच माणसाने समजुन घेण्याच्या सवयीची लस टोचुन घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टांपासुन दुर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही.
- मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही... त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी... माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही.
- बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं. पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण, व्यक्ती कधी नां कधी संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत रहाते.
- मी कोणापेक्षा तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल. आयुष्यात काही शिकायच असेल तर वाहत्या पाण्याकडून शिकावं वाटेतला खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं.
- सगळेच विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते, तिला ना सुंदर बाईंडिंग असते, ना सुंदर कव्हर. कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची पण अशीच अवस्था असते.
- भलेही तो जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना मात्र दोन चार महिने सहज टिकायच्या. आजकाल आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट होतात. मग जिवाचं कोणी जवळ मिळणं, असणं म्हणजे परीस सापडणं होय.
- पाण्याचा तळ स्वछपणे दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच, माणसाच्या मनाचा तळ समजला की, सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ असायला हवे.
- काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय मन वळत नाही, बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही, कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सोबत चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही.
- बी फोडले तर हाती काहीच लागत नाही, पण तेच बी जर जमीनीत पेरले तर त्यातून हजारो नवीन बियांचे दाणे तयार होतात. आपल्या विचारांचेही तसेच आहे. आपण आपल्याजवळ असलेले चांगले विचार एखाद्याच्या मनात रुजविण्यात यशस्वी झालो तर चांगला विचार करणारी हजारो माणसं निर्माण होतात.
- क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधी तरी, कुठे तरी आणि केव्हातरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच "आयुष्याचा टर्निंग पाँईंट " म्हणतात.
- नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसत. कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं. हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं. कारण ज्यांना हातच नसतात, भविष्य तर त्यांचही असतं.
- कितीही कमवा पण कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात. आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.
- शाळेच्या कवायतीमध्ये पीछे मुड बोलताक्षणी, पहिला माणुस शेवटी आणि शेवटचा माणुस पहिल्या क्रमांकावर येतो. आयुष्यातंही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचे कधीच दुःख मानु नका. माहिती नाही हे आयुष्यं कधी म्हणेल, 'पीछे मुड'.
- जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण, माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो, जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे; जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो.
- स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही. प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये. जिवलगाची सोबत कधी सुटु नये. नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.
- जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलतात मूळ्या नाही. भगवत गीतामध्ये स्पष्ठ लिहिलंय. निराश होऊ नकॊ, कमजोर तुझी वेळ आहे तु नाहीस.
- हालात जैसे भी हों डटे रहो क्योंकि सही समय आने पर खट्टी कैरी भी मीठे आम में बदल जाती है ।
- वाद आणि संवाद या दोन्हीत फार मोठा फरक असतो. कारण वादातून मी कसा योग्य आहे हे सांगितले जाते तर संवादातून काय योग्य आहे हे सांगितले जाते. त्यामुळे आपल्यात वाद नको तर संवाद असावा.
- ज्याला सत्य बोलण्याची सवय असते तो कुठेच अॅडजस्ट होत नाही. ना नातेवाईकांमध्ये, ना कुटुंबात, ना ऑफिसात, ना समाजात. कारण सत्य बोलणारी व्यक्ती सर्वांना टोचते.
- प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नाही. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य.
- "जप" आणि "जप" हे दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण ऊच्चारायला वेगवेगळे आणि दोन्हीचे अर्थ भिन्न आहेत. परमेश्वरा चे नामस्मरण म्हणजे 'जप' आणि स्वतःला सावरणे म्हणजेही 'जप'. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हां भगवंत आपल्याला जपतो.
- जबाबदारी पुर्ण करण्यासाठी वय मोठं नाही तर मन मोठं पाहिजे, कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज उडणारा पाला-पाचोळा एकेकाळची हिरवळ असते. जीवनात येणारे सुखदुःखाचे,अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करीत असतात.
- पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
- नाती सांभाळून आणि टिकवून ठेवायची असतील तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखे ऐकून न ऐकल्यासारखे आणि बोलता येत असूनही मुक्या सारखे रहावे लागते.
- आयुष्यातला खरा आनंद संगतीतच आहे. संगत जर चांगल्याची असेल तर संकटांनी तुम्हाला कितीही आपटू द्या, आदळू द्या किंवा पाडू द्या पण ठरवलेली गोष्ट सोडू नका. चालत राहा, तुम्ही यशस्वी व्हाल.
- संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेऊन काम कराल, तेवढेच यश ही मोठेचं असते. कुणाला दुखावून मिळविलेला आनंद, कधीच सुख देऊ शकत नाही. पण कुणाला आनंद मिळावा, म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो.
- प्रेमाने चार घास खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत लाभली की आयुष्यातली रंगत वाढत जाते नाही तर आयुष्य म्हणजे कॅलेंडरच्या रिकाम्या चौकटी.
- नेहमी असे वाटते की लोक आपल्याला दुखावतात. पण ते तस नसतं तर लोक नेहमी आपल्याला काही तरी शिकवतात.
- कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. कारण, प्रत्येक जण आपआपल्या संकटाशी आपल्या पध्दतीने झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपविता येतात. तर, काहींना नाही.
- जे घडत ते चांगल्यासाठीच…! फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!
- मैत्री अशी करा की जग आपलं होईल, माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, प्रेम असं करा की
- जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
- भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो. म्हणून जुन्या, झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कमाल लागलं पाहिजे.
- नारळ असो किंवा माणूस दिसायला कितीही चांगला असला तरीही नारळ फोडल्या शिवाय आणि माणूस जोडल्या शिवाय कळत नाही.
- माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या अपेक्षेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं आणि उंच उंच वाढत राहावं.
- एकदा वेळ गेली, की सर्व काही बिघडते असे म्हणतात, परंतु कधी कधी काही सुरळीत होण्यासाठीही वेळ जाऊ द्यावा लागतो.
- मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका.
- हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग नाही.
- जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि स्वत: वर विश्वास ठेवला तर अडचणी आनंदात बदलून जातात.
- माणसाने आपल्या गरजेनुसार जीवनप्रवास केला पाहिजे, तो आपल्या इच्छेनुसार करू नये. कारण गरजा तर गरिबातील गरीब माणसाच्याही पूर्ण होतात परंतु इच्छा मात्र राजाच्याही अपूर्णच राहतात.
- कावळे काव काव करुन कोकिळेचा आवाज दाबू शकतात. परंतु स्वतःचा आवाज गोड बनवू शकत नाहीत. त्याप्रमाणे निंदा करणारा व्यक्ती सज्जनाला बदनाम करू शकतो पण स्वतःला सज्जन कधीच बनवू शकत नाही.
- यश कधी मोठं नसतं, मिळवणारा मोठा असतो. खड्डा कधी मोठा नसतो, खड्डा भरणारा मोठा असतो आणि नाती कधी मोठी नसतात, नाती निभावणारे मोठे असतात.
- जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेंव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात.
- सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातच.
- एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो. परंतु धागा सोबतीला आला की, हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.
- जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळेच चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा. माणसं बदलण्यात वेळ घालवू नका. आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआप बदलेल.
- दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो... कदाचित संपूर्ण आयुष्य.
- बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही.
- आपल्या जीवनातील सर्व धावाधाव ही फक्त आपल्याकडे आहेत त्यापेक्षा अधिकचे मिळवण्यासाठी आहे. आपल्याला अधिकचा पैसा, अधिकची ओळख, अधिकची प्रतिष्ठा, अधिकची संपत्ती ही हवी असते. जर आपण हे सर्व अधिकचे मिळविण्याचा हव्यास सोडला तर आपले जीवन हे खूपच साधे आणि सरळ आहे.
- अंदाज चुकीचा असू शकतो, परंतु अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे.
- आपल्या विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी रहावे.
- माणसाचे कपडे फाटले तर, ते शिवता येतात. पण विचारच फाटके असतील, तर आयुष्याच्या चिंध्या होतात. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, पण एखादी गोष्ट बोलावी की नाही, हे आपला संयम आणि, संस्कारावर अवलंबून असते.
- माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात.
- आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत.
- सोनं वितळले की दागीना बनतो, माती नरम झाली की शेती पिकते, पिठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या मनात त्याची जागा बनते. आयुष्य एकदाच आहे, मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा.
- कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो, जो पर्यंत तुमची गरज असते. एकदा का गरज संपली की, वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते.
- आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं हे शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात.
- माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखाला काटे असतात असे नाही, तर सुखाचे काटेही असतात, जे आपल्यावर जळणाऱ्यांना टोचत असतात.
- गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा. मग तो दोऱ्याचा असो, किंवा स्वत:च्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही.
- सगळे स्पष्ट दिसत असून सुध्दा कधी कधी आपल्या जवळच्या माणसांसाठी आंधळे व्हावे लागते कारण आत्तराची बाटली किती ही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरू कधीच बसत नाही त्यांना सुध्दा खरे आणि खोटे यातील फरक समजत असतो.
- आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.
- मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही.
- गेलेल्या संधीचा विचार करत बसण्यापेक्षा, पुढे येणाऱ्या संधीचे स्वागत करून त्याचे सोने करा. यशस्वी लोकांपेक्षा अपयशी लोकांचे अनुभव वाचले तर यशाचा मार्ग सापडणे अधिक सोपे होते.
- प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. परंतु जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील.
- ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय, तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते. कारण आनंदाची किंमत त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते.
- अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाच माणसाला अनेकदा हरवते, हे ज्यांना समजत नाही, त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही.
- आयुष्यात यश मिळते, तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो, तेव्हा कळते कि आपले कोण आहेत.
- संकटाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठंच मुक्कामाला रहात नसतो. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिम्मत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तीत होते.
- एक वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे पण आपल्यांचे नको कारण आपले वेळ आली की सगळं उकरून काढत असतात... दुसऱ्यावर डिपेंड राहून हर्ट होण्यापेक्षा एकट राहुन स्वतःची लाईफ एन्जॉय करा.
- नेहमी आवडणारी कामच वाट्याला येतात, असं नाही… काही कामं कर्तव्य म्हणूनही करायची असतात..! वर्गातला फळा कितीही स्वच्छ पुसला तरी मागच्या तासाची काही अक्षरं अंधुक राहतातच… हेच आयुष्याच्या शाळेचही..!
- शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.
- माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात.
- वेळ, मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते.
- तुमच्या विचारातून तुमचे व्यक्तिमत्व झळकत असते, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते. प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरुन त्यांची पात्रता कळते; तुमची नाही.
- दुबळ्यांची शिकार करून आपल्या सामर्थ्याचा मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो. व्यक्तिमत्त्व असे घडवा की, कोणी ही आपल्या मागे वाईट बोललं तरी ऐकणार्याला ते खोटं वाटलं पाहिजे.
- कोणतीही गोष्ट न चिडता, न रागवता सांगणे हे ज्याला जमले त्याला "आयुष्य" जगायचे जमले. कारण समोरच्यावर चिडणे खूप सोपे आहे, पण त्याचे मन न दुखावता त्याला ती गोष्ट समजाऊन सांगणे तेवढेच अवघड आहे.
- नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात. मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख, अनोळखी देखील विसरत नसतात.
- शब्द दुमदुमला तर "नाद" होतो. शब्दाला शब्द घासला तर "वाद" होतो. शब्दात शब्द खुलला तर "संवाद" होतो. शब्दाने शब्द फुलला तर "सुसंवाद" होतो.
- मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची वा भल्याची प्रार्थना करणाराच असतो. आयुष्यात काही काही सत्कर्म अशीही करावीत की, ज्याचा साक्षीदार ईश्वराशिवाय दुसरा कोणीच नसावा.
- जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही. आयुष्य एका मिनीटात नाही बदलत ते बदलते आपण त्या एका मिनीटात घेतलेल्या निर्णयावरुन.
- जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात.
- कमीपणा घेणारे कधीच लहान किंवा चुकीचे नसतात. कारण लहानपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं.
- आपल्या जीवनप्रवासात मिळणारा अनुभव कधीही व्यर्थ जात नाही. अनुभव हा उन्नतीचा मार्ग असतो, जो प्रत्येक व्यक्तीला सक्षम आणि दृढनिश्चयी बनवतो.
- जन्म एका टिंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं...प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.
- प्रेम व आनंद देणार्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते; आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते.
- वेळ, तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते.
- आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द इतकी महत्त्वाची असली पाहिजे की सकाळी जाग ही अलार्म वाजण्याच्या अगोदर आली पाहिजे. घड्याळाच्या गजरा पेक्षा ज्यांना जबाबदारी जागं करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात.
- रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते.
- तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं तडा जाईल तिथं जोड देता आली की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.
- एकदा फुल फांदी वरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात, तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात, पण उत्साह आणि विश्वास असेल तर, येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो.
- प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते. आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
- मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.
- ज्या माणसाच्या जवळ सत्य, पावित्र्य आणि निःस्वार्थवृत्ती या तीन गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. हया तीन गोष्टी असल्यावर आख्खे विश्व जरी विरोधात उभे राहिले तरी, त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकतो.*
- माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वठत नाही, तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खर प्रेम असतं जीवनावर मग ते जीवन कितीही विद्रूप, कितीही भयंकर असो, कारण मृत्युनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो.*
- जे बदलता येईल ते बदलावे. जे बदलवता येणार नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारण्यायोग्य नाही त्याच्यापासून दूर रहावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे.
- वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
- लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
- मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात.
- घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे.
- पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते.
- ज्याप्रमाणे अंधव्यक्तीला आरशाची आणि ऐकू न येणाऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याच प्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते ...
- आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतात.
- गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा.
- मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
- चेक असो वा विश्वास.... गरजेच्यावेळी बाउन्स झाला की, त्या व्यवहारालाही आणी नात्यालाही किंमत राहत नाही.
- पायातून काटा निघाला, की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार, निघून गेला की आयुष्य, जगायला मजा येते.
- समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल.
- एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो.. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतुन जावं लागतं.
- ओळख बनवायची असेल तर एकट्याने लढायला आणि बोलायला शिकलं पाहीजे. घोळक्यात बोलणाऱ्यांचे पत्ते लगेच सापडत नाहीत.
- जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोखी रात्र सरली की लख्ख पहाट असते.तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं.
- जिवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही, एकतर ते जिंकतात किंवा समोरच्याला धडा तरी शिकतात.
- संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं कारण माणूस त्या काळात एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर तर सगळी दुनिया बरोबर असते. त्यामुळे कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत, ठणकून सांगावे जगाला काट्यांनी वेढलेला मी पण एक गुलाब आहे.
- कर्तुत्ववान माणसे कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत. नशीबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तुत्ववान होऊ शकतीलच असे नाही. म्हणूनच माणसाने नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हावे! यश आपली वाट पाहत आहे.
- किंमतीवरून नाही हिंमतीवरून ओळखा, शब्द फिरवणारे लाख मिळतील पण, शब्द पाळणारा एखादाच मिळेल.
- खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचा एक फायदा असतो.. मनावर कुठलंही ओझं राहत नाही.
- आयुष्याचं सुख कशात आहे माहित नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती. जेव्हा समोर मोहाचा पसारा नटलेला असतो. तिचं खरी वेळ असते जगासमोर स्वतःला एकनिष्ठ निष्ठावंत बनून उभं राहण्याची. डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
- परीस्थिती आडवी झाली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच यश भरभरून मिळत असत.
- नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात... पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. परंतु... सर्वात कठीण पाचवी पायरी आहे ती म्हणजे निभावणे.
- जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल, तर धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहचायला हवा.
- चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका. कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता, तेव्हा ते तुटले जात नाहीत... पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात.
- पदरी अपयश आले की, कोणीही फारसे संबंध ठेवत नाहीत. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की, मुकेही बोलू लागतात.
- जिवनात त्रास त्यांनाच होतो, जे सतत जबाबदारी स्वीकारतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
- सुंदरता एखाद्या गोष्टीत नव्हे तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असावी लागते.
- आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. समोरच्या व्यक्तींनी निष्ठुरता दाखवली की आपल्या भावनांचं मरण आपसूक जवळ येतं.
- वय वाढल्याने हसणं थांबत नाही पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकर वाढतं.
- मदत आणि स्मित हास्य ही अशी दोन सुगंधी द्रव्ये आहेत, जेवढी तुम्ही दुसऱ्यांंवर शिंपडाल, तेवढे तुम्ही जास्त सुगंधीत होत जाणार.
- दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की, आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं.
- पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत... म्हणूनच की काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...! अगदी आपल्या आई-वडीलांसारखं. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणार्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही.
- शब्द हे चावी सारखेच असतात... कधी मन मोकळे करतात तर कधी... तोंड बंद करतात.
- सुखाचं नेटवर्क हे नेटवर्क नसणाऱ्या ठिकाणीच जास्त अनुभवायला मिळतं.
- मनातलं जाणणारी 'आई' आणि भविष्य ओळखणारा 'बाप' या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
- कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही. फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला, तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.
- होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता, फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही.
- आयुष्यात किती पावसाळे पाहिले? हे महत्वाचं नसतं तर... त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली, हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात.
- दैनंदिन जीवनात व्यक्तीचे हास्य, हे खूप समाधानकारक असायला हवे, कारण मनात जरी विचारांचे वादळ चालू असले, तरी चेहऱ्यावरील हास्य, हे व्यक्तीला जगण्याची कायम, एक नवीन आशा देत असते.
- अनुभवाने आपण शिकतो, कर्माने आपण मोठे होतो, माणुसकीने माणुसपण जपतो, प्रेमाने माणसांची मने जिंकतो, पण चांगल्या कर्तृत्वाने समाजाच्या कायम लक्षात राहतो.
- स्वतःच्या चुकांची खापरं दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडणं सोपं असतं. परंतु अवघड असतं ते म्हणजे स्वतःच्या चुका मान्य करून जमलं तर त्या सुधारणं. अन् पुन्हा तीच चुक आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणं.
- मनुष्याला स्वःताची माणूसकी विसरायला लावणारी एकमेव चैनीची वस्तू म्हणजे पैसा. जगात कोणतीही गोष्ट तुम्ही पैसाने मिळवू शकता पण मायेची माणसं मिळविणे खूप कठीण आहे. पैसा येतो आणि जातो, त्यामुळे आपल्यातील माणूसकी जाऊ देऊ नका.
- आपल्या आयुष्याची रेल्वे रुळावर आणणं, आणि शेवटपर्यंत रुळावर ठेवणं, हे आपल्याच हातात आहे. रेल्वे एकदा रुळावरून घसरली की अपघात होतो. तसं आपलं आयुष्यही रुळावरून घसरू द्यायचं नसतं. तरचं पुढील प्रवास सुखकर होईल.
- आपल्या आयुष्याची रेल्वे रुळावर आणणं, आणि शेवटपर्यंत रुळावर ठेवणं, हे आपल्याच हातात आहे. रेल्वे एकदा रुळावरून घसरली की अपघात होतो. तसं आपलं आयुष्यही रुळावरून घसरू द्यायचं नसतं. तरचं पुढील प्रवास सुखकर होईल.
- कोट्यावधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणसं आणि माणुसकी कमवावी लागते.
- सहकार्य आणि चांगले कर्म आवाज न करता केले तर त्यातुन घुमत राहणाऱ्या आवाजाचे माधुर्य आणि समाधान अतुलनीय अनुकरणीय असते.
- बुद्धी सगळ्यांकडे असते, परंतु त्या बुद्धीच्या साहाय्याने आपण चलाखी करतो की, इमानदारी हे आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. आपण केलेली चलाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी मात्र आयुष्यभर टिकून राहते.
- जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकुन घेणारे कान आणि समजुन घेणार्या हृदयाची गरज असते.
- गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर, माणसंच साथ देतात.
- आयुष्यात सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात, कारण सूत्र कमी पडतात. न येणारे प्रश्न सुद्धा सोडवायला गेले तर जे प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत त्यांच्यासाठी वेळ मिळणार नाही आणि आयुष्य मात्र संपेल.
- गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या वेळीच बोलुन मोकळे झालेले केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं.
- अपेक्षा, तुलना किंवा ईर्षा करण्यात आपला किंमती वेळ वाया घालवू नका. कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो.
- जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं.
- जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही.
- भावनांचा अन् वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात.
- ज्या प्रमाणे सोन्याची परीक्षा चार प्रकारांनी करतात घासून; तुकडा पाडून; तापवून आणि आघात करून तसंच माणसांची परीक्षा सुध्दा त्याचप्रमाणे शिक्षण; चारित्र्य; घराणं आणि काम यावर करतात.
- काही वेळा आयुष्यात आपल्याला थोडाफार तरी त्रास होणं गरजेचं असते. कारण आपण वाईट आहोत म्हणून नाही तर, चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे आपल्याला कळण्यासाठी ते आवश्यक असते.
- जीवनाच्या प्रवासात, एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडेच, पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर, माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने, साथ सोडल्यावर माणूस रोज, थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात.
- जीवनातील प्रवासामध्ये आपले बोट कोणी धरलंय हे महत्वाचे, तो कृष्ण असेल तर आपण अर्जुन, आणि शकुनी असेल तर आपण दुर्योधन हे निश्चित.
- जेव्हा आपण श्रेष्ठ आणि दुसरे तुच्छ हे दाखवायचा आपण दुबळेपणा करतो, त्यावेळी एकप्रकारे दुसरे श्रेष्ठ आणि आपण स्वतः तुच्छ आहोत हे आपणच सिद्ध करत असतो.
- जगातील सर्वात सुंदर व अप्रतिम संगीत म्हणजे आपल्या ह्रदयातील हार्ट्बीट्स होय कारण... ह्याला साक्षात परमेश्वराने कंपोझ केले आहे. म्हणुन नेहमी हृदयाचे ऐका.
- सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते.
- दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती होय.
- आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका कारण त्या शुन्य समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे पण मन जर शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही.
- जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काहीही न लपवता मनमोकळे जगणे, यातच खरी सुंदरता आहे.
- प्राण्यांना पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी मात्र त्यांना स्वतःच प्यावं लागतं. तसेच कितीही लेख वाचा, भाषणं ऐका, व्हिडिओ बघा, तरी जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही, तोपर्यंत बदल घडणारच नाही.
- संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो, तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात, तेव्हा संस्कृती सुधारते.
- आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुध्दा कुठे तरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं.
- नातं कुठलंही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं, शब्दांपुरत नाही आणि राग हा शब्दांपुरताच असावा, मनातून नाही.
- फार कमावून गमवण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे मग तो पैसा असो की माणसे.
- समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल मी दुनियेबरोबर लढु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांबरोबर मला जिकांयचे नाही तर जगायचे आहे.
- हसतमुख माणसांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो, काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत तथा उल्हसित होते, विचारांचं नात इतकं घट्ट असावं की, मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत.
- प्रवासात शेवटचा स्टॉप आल्यावर रिकामी होणारी खिडकीच्या बाजूची शीट उपयोगाची नसते. त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात व्यक्ती किंवा वस्तू ज्या वयात भेटायला हव्या तेव्हाच भेटायला हव्यात, नाहीतर त्यांच महत्त्व शुन्य होतं.
- सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते कारण अहंकार कधीच सत्य स्विकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार आवडतात.
- आयुष्यात संगतीला फार महत्व आहे, कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधुन येतात.
- आकर्षण हे सौंदर्याचं व धनाचं नसावं तर आकर्षण हे चांगल्या विचारांचं आणि माणसात असलेल्या चांगल्या संस्काराचं असावं.
- झुका तितकंच जितकं बरोबर आहे. कारण विनाकारण झुकण्याने सुध्दा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो.
- काही लाखांची गाडी एका चावी आणि ब्रेकवर अवलंबुन असते, कोटींची घरं सुद्धा एका कुलूप आणि किल्ली वर सुरक्षित असतात. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते.
- यशाला चकाकी तेव्हाच मिळते, जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो, अन् व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते, जेव्हा त्याची कृती प्रामाणिक असते.
- मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव नाती मान सन्मान चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे.
- केवळ मन समुद्राएवढे असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी, वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते आणि तेही हसत-हसत. तरच आपल्यातील नाती दृढ होतात आणि टिकतात.
- जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला असेल, तरीही स्वतः मधला गोडवा जपता यायला पाहिजे. त्यामुळे शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेल सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परस्थितीला दिलेल प्रत्युत्तर.
- स्वभाव मनापर्यंत पोहचला तरचं आपुलकीचं नातं निर्माण होत, नाही तर ती फक्त ओळखच ठरते.
- जोपर्यंत आपण धावण्याचे धाडस करणार नाहीत. तोपर्यंत कोणत्याही स्पर्धेमध्ये जिंकणे आपल्यासाठी नेहमीच अशक्य राहील. प्रयत्न केल्यावर अशक्य गोष्टही शक्य होते.
- लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतंच नाही, तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनंही जुळत नाहीत.
- आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो.
- चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो मग तो चहाचा असो की आयुष्याचा.
- आयुष्यातील कोडी सोडवायला माणसाच्या स्वभावात गोडी असावी लागते.
- प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे किंवा भाग्यात असणे हे आपल्या हातात नाही. परंतु आपल्या भाग्यात नसणारी गोष्ट आपल्या भाग्यात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्याच हातात असतात. प्रयत्न केल्याने कोणतीच गोष्ट अशक्य नसते.
- उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात.
- धनवान होण्यासाठी एक-एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी, एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. ह्या जीवनाचा पैसा पुढच्या जन्मी कामी नाही येत. पण ह्या जन्माचं पुण्य जन्मो- जन्मी कामी येतं.
- टेकडीवरच्या सूर्याची पण काय गंमत असते ना! पूर्वेकडे असला की तो सुर्योदय पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त. माणसाचं पण तसचं आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरूध्द वागला तर वाईट. दोष त्यांचा नाही तर त्यांच्या विचारसरणीचा आहे.
- स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची एक-वेळ जाणीव नाही झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासली पाहिजे.
- आयुष्यात आपण आपली Image कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची Qality समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या Clearity अवलबून असते.स्वतःची image बनविण्याच्या नादात माणूस मन मारून जगत असतो.
- मन मारून जगलं ना की आयुष्य बरच महान होतं पण मला फक्त एवढंच कळतं मन मारून जगलं की जिवंत आयुष्याच स्मशान होतं त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली जगू नका.कोणत्याही मोहाला बळी पडू नका.कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका आणि कुणावरही अवलंबून राहू नका.
- विषय शून्याचा असो नाहीतर अनंताचा. स्वाभिमानापुढे काहीच नाही.
- मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे; जिथं जिथं तडा जाईल, तिथं तिथं जोड देता आला की, कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.
- तुम्ही कसं बोलता याला खूप महत्व आहे कारण दिसणं केवळ आकर्षित करू शकतं तर बोलणं हृदयात स्थान मिळवतं.
- नियती माणसाला फक्त जन्म देते पण माणूसकी ही माणसाला स्वतः निर्माण करावी लागते.
- चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही, शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं, चुकणं ही प्रकृती मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे.
- जीवनात तुमचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला कधीही चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही. जे जे होईल ते सर्व चांगलेच होणार आहे असा विश्वास बाळगा नियती तसेच घडवेल. कारण प्रयत्न आपले असतात मात्र फलप्राप्तीसाठी राजयोग असावा लागतो.
- स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खुप आवडत असतात.
- आपली नैतिकता, मूल्ये आणि त्यासंबंधित आपली भूमिका ही आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख असते.
- जसं उकळत्या पाण्यात स्वतःच प्रतिबिंब दिसत नाही, तसेच क्रोध उत्पन्न झाल्यावर सत्य सुद्धा दिसत नाही.
- नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे ही उजेड पडतो.
- तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका, आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका.
- जबाबदारीची जाणीव असणारी माणसे, फारशा सवाल - जवाबाच्या फंदात न पडता समोरील काम कसं पूर्ण करता येईल, यासाठी ते प्रयत्न सुरू करतात. म्हणूनच झिजलेले खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात.
- शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवू द्यायचे नाहीे आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही.
- तुमच्या बोलण्याचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील या भ्रमात मुळीच राहू नका, तुम्ही कितीही चांगलं बोला तुमच्या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण त्यांच्या स्वभावानुसारच घेत असतो.
- आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे.... जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते.... आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी.... प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते.
- आपला स्वभाव हा मोफत नेटवर्क सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. आपल्या आजूबाजूचे लोक आपोआपच जोडले जातात. थोडक्यात आपला प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगल असणं महत्त्वाचं आहे.
- ज्याचे पाय शाळा सुटल्या नंतरही शाळेत रेंगाळत राहतात आणि या पायांभोवती आठ दहा छोटी पावलं घुटमळत असतात तोच खरा शिक्षक.
- एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य जाते. त्यामुळे दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नयेत कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची पद्धतच आहे.
- आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात. कारण, वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो. वाटणं हा आभास आहे. तर असणं हा विश्वास आहे.
- जेव्हा आपण आपल्या नवीन दिवसाची सुरुवात करतो तेव्हा आपल्या जवळ हे तीन शब्द पाहिजेत प्रयत्न, खरेपणा आणि विश्वास. प्रयत्न आपल्या उत्तम भविष्यासाठी, खरेपणा आपल्या कामामध्ये आणि विश्वास आपल्या ईश्वरावर पाहिजे. तरच यश आपल्या पायाशी असेल.
- संसाराची कर्तव्ये पार पाडून आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होते, तेव्हा उरलेले आयुष्य निवांत काढायचं असतं, पण काहींच्या वाट्याला इतका संघर्ष असतो कि तो आयुष्याच्या शेवटपर्यंत संपत नाही.
- काय बोलावे, हे ज्ञान ठरवते. कसे बोलावे, हे कौशल्य ठरवते. किती बोलावे, हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी, हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते.
- सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील. म्हणून वाट पाहत बसलात. तर कदाचित आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत असं आपण ठरवलं तर आपण आयुष्यभर सुखी राहू.
- बुध्दीचा वापर करणाऱ्यांपेक्षा मनाचा वापर करणारी लोकं चांगली असतात...कारण बुध्दीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोकं मात्र आधी दुसऱ्यांचा विचार करतात.
- माणसाने परमार्थ करताना आपल्यापेक्षा मोठ्यांचा विचार करावा आणि प्रपंच करताना आपल्यापेक्षा खालच्यांचा विचार करावा, नक्कीच प्रत्येकाला समाधान मिळाल्या शिवाय राहणार नाही.
- आयुष्यात खेळ कोणताही खेळा पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्यांच्या भावनांचा विचार करून बोला कारण दिवस जरी चोवीस तासांनी बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदानेबदलत असते हे लक्षात ठेवा.
- जीवनामध्ये यशस्वी होण्याचे रस्ते खूप आहेत, फक्त त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट आपल्या पावलांनी घेतले पाहिजे, यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार, महत्वकांक्षा, आत्मविश्वास आणि मेहनत करायची तयारी असली पाहिजे.
- मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका... कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे.
- दुःख आणि त्रास ह्या ईश्वराने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत. ज्याठिकाणी आपल्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
- आव्हान देणारे, बेचैन करणारे, भंडावून सोडणारे, झपाटून टाकणारे प्रश्न हे माणसाच्या बुद्धीचा गंज काढून कर्तृत्व फुलवित असतात. बेचैनी, अस्वस्थता ह्या नवनिर्माणकारी असून, उज्ज्वल भवितव्याची हमी असतात.
- कावळा कुणाचं धन चोरत नाही तरी तो लोकांना प्रिय नसतो. कोकिळा कुणाला धन देत नाही. तरीही ती लोकांना प्रिय असते कारण फरक फक्त गोड बोलण्याचा आहे. ज्यामुळे सगळेच आपलेसे होतात.
- चुकीला चूक, आणि बरोबर ला बरोबर, म्हणायला शिकलं पाहिजे. नुसतं स्वार्थासाठी जगणं, सोडून दिलं पाहिजे. जिथे चूक नाही तिथे झुकु नका. आणि जिथे सन्मान नाही, तिथे थांबू नका. उशिरा मिळालेले सत्य हे, कुलूप तोडल्यानंतर, चावी मिळाल्यासारखे असते.
- श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपसता ती पण श्रीमंती असते.
- परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणुसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं.
- जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते.
- ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे "भान" असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे "ज्ञान" असणे. दुसऱ्याचं चांगल (भलं) करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते तर फक्त मनात चांगली भावना असावी लागते. सुखाचे अनेक भागीदार आपणांस भेटतील परंतु दु:खाचा एक साक्षीदार भेटायला सुध्दा नशीब लागतं.
- जर दुनिया विश्वासावर चालत असती तर बंद दरवाजाला कुलुप लावायची वेळ आली नसती.
- ताकदीची गरज त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करायचे असते, नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते, कारण "प्रेमानेच जग जिंकता येते.
- जपता येत नसेल तर कुरतडू तरी नये, कारण भावना मोरपिसाहूनही अधिक नाजूक व अलवार असतात.
- दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काहीही नसलं तरी चालेल पण किमान सर्वांना सन्मान देता आला पाहिजे.
- खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. दुसऱ्याला बदलण्याच्या प्रयत्न करण्यात अपयश येईल. आधी स्वतःलाच बदला मगच यश मिळेल.
- नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याच प्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वी जीवनाचा आस्वाद घेणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे तर तो यशाचाच एक भाग आहे.
- आयुष्यात आपण किती पावसाळे पाहिले, याला महत्त्व नाही. पाहिलेल्या पावसाळ्यात आपण किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली, हे अनुभव खऱ्या अर्थाने आपले जीवन संपन्न करीत असतात.
- जिवनात खरं बोलून, मन दुखावलं तरी चालेल पण खोटं हसून, खोटं बोलून आनंद देण्याचा कोणालाही कधीच प्रयत्न करू नका. कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या सारख्या जवळच्या वाटणाऱ्या, माणसांच्या विश्वासांवर म्हणून त्यांचा विश्वास घात कधीही करू नका.
- आयुष्यात समाधान शोधत चला, कारण सुखांची यादी कधी संपतच नाही. ठेचा तर लागत राहणारच, त्या पचवायची हिम्मत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा. माणसाला स्वतःचे छायाचित्र काढायला वेळ लागत नाही. पण स्वतःचे चारित्र्य घडवायला खूप वेळ लागतो. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो.
- तुमच्याकडेही एक रुपया आहे, माझ्याकडेही एक रुपया आहे, आपण आदलाबदल जरी केली तरी प्रत्येकाकडे एक-एक रुपयाच राहील. पण तुमच्याकडे एक चांगला विचार आहे, माझ्याकडेही एक चांगला विचार आहे, आपण त्यांची आदलाबदल केली तर प्रत्येकाकडे दोन-दोन चांगले विचार होतील.
- कुठलीही गाठ बांधताना, धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके, समान ओढावी लागतात. तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचही असचं आहे, दोन्ही बाजुने समान ओढ असेल, तरच नात्यांची गाठ घट्ट बसते.
- संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं कारण जीवन हे पाण्याच्या प्रवाहासारखं असतं. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावे लागतिलचं.
- वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल.
- प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाहीत.
- सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते कारण अहंकार कधीच सत्य स्विकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार.
- जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात.
- कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास, आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही, म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा, प्रयत्नवादी व्हा, यश तुमची वाट पाहात आहे.
- कोणत्याही व्यक्तीने आपणाबद्धल काय बोलावे, ही आपल्या नियत्रंणाबाहेरची बाब आहे; परंतु त्याबद्दल आपण किती विचार करायचा ही आपल्या नियंत्रणातील गोष्ट आहे...
- लोकांनी आपल्या भल्यासाठी दिलेला सल्ला किंवा केलेली टिका आपल्याला मान्य नसते, सहनही होत नाही पण खोटी स्तुती, प्रशंसा, जी आपल्याला बरबाद करते, ती लगेच डोक्यात जाते.
- चाळणीमध्ये सुध्दा पाणी, साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम हवा. ज्यांची वेळ खराब आहे, त्यांची साथ कधीच सोडू नका. परंतु ज्यांची नियत खराब आहे, त्यांच्या सावलीला सुध्दा जवळ करू नका.
- साथ बरोबर असली की जगण्यात पण रुबाब असतो. चेहऱ्यावर रंग रंगोटी करुन, पोशाख बदलून नशीब बदलणार नाही तुमचे विचार आणि कृती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचे नशीब लिहते. जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या चार खांद्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो.
- समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका कारण आग जरी थंडी झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो. आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही. जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, कारण, इथे वन्समोअर नसतो.
- मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण काही वेळा शांत बसणंच बंर असतं. आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं. एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं. जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं.
- रानावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील.
- चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य ह्या चारही गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर आपल्या जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत.
- पाण्यात आणि मनात, साम्य ते काय? दोन्ही जर गढूळ असतील, तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील, तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील, तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात. पण पाण्यात आणि मनात, मुख्य फरक तो काय? पाण्याला बांध घातला, तर पाणी संथ अन् मनाला बांध घातला, तर माणुस संत होतो.
- हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, आपण पुढे कसं वागायचं, याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
- आनंद पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खूश होतो. तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खूश होतो.
- नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार.
- सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो.
- आपण आपल्या घरात, खोलीमध्ये आपल्या चांगल्या आणी आवडत्या वस्तू ठेवतो. ज्या गोष्टी आवडत नाही किंवा खराब झाल्या त्या अलगद उचलून दुसरीकडे नेऊन ठेवतो. उगाच मनस्ताप करत बसत नाही. अगदी त्याप्रमाणे, आपल्याला वाटलं की एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायला लागला तर तो त्रास वाढू न देता अलगद सोडून द्या. व्यक्ती त्रासदायक असेल तर त्यांच्यापासून दूर व्हा. कारण त्यांना समजवता समजवता तुम्ही स्वतःला विसरत जाता आणी ते होणे योग्य नाही. लोकांची मन जपा पण त्याआधी तुम्हालाही मन आहे हे विसरू नका.
- प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यांतून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मितहास्यातून व्यक्त होते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात, आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात.
- समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
- नासलेल्या दुधातून पण अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात, गरज असते ती 'दुध नासले' या निराशेतून बाहेर पडण्याची...आणि थोड्याश्या कल्पकतेची, जीवनही असेच असते, आलेल्या प्रत्येक संकटात दडलेली संधी शोधता आली की बरेचसे प्रश्न सुटतात.
- नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका; कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते. माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे. लोकांच काय, लोक तर देवात पण चुका काढतात.
- अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते, तरीही तो शञू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात.
- रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते. रडणारी सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात. तर लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात. जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्रय नाही. त्यामुळे स्वावलंबी बना.
- चैन से जीने के लिए, चार रोटी और दो कपड़े काफ़ी हैं, पर बेचैनी से जीने के लिए चार मोटर, दो बंगले, और तीन प्लॉट भी कम हैं। आदमी सुनता है मन भर, सुनने के बाद प्रवचन देता है टन भर, और खुद ग्रहण नहीं करता कण भर।
- श्रीमंत असूनही ज्यांना संपत्तीचा गर्व नसतो, तरूण असूनही ज्यांची मनोवृत्ती चंचल नसते, हाती सत्ता असूनही जे प्रमत्त झालेले नसतात अशा व्यक्ती त्यांच्या अंगी असलेल्या मोठेपणामुळे समाजात शोभून दिसतात. - श्री स्वामी समर्थ
- समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे.
- तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात. पण एक काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
- समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुस-याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.
- लोकांचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे केलेले आत्मपरीक्षण कधीही उत्तम.
- आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही. परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधी अपेक्षा नसते, यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल मिळालेले आशिर्वाद असे म्हणतो.
- तुमच्या नावाच्या बदनामीच्या अफवा फक्त दोनच प्रकारचे लोक पसरवत असतात. एक म्हणजे ते जे कधीच तुमची बरोबरी करू शकत नाही आणि दुसरे म्हणजे ते ज्यांना त्यांच्या चुकीमूळे आधीच तुम्ही स्वतःपासून लांब केलंय.
- मााणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दुःख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसे आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणूस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे आणि सर्वात महत्वाचे वेळ सांगते नाते कसे आहे.
- निष्ठेने आणि तत्वाने जे मिळवाल. तेच आयुष्याच्या बेरजेला राहते, बाकी नियतीच्या वजाबाकीत सर्व गायब होते. माणसाचे दोन गुरू असतात एक अनुभव आणि दुसरा कर्म हे दोघेही सोबत राहतात. कर्म हे लढायला शिकवत असतो आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो.
- दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.
- कर्तृत्ववान माणसे कधीही केव्हाही नशिबाच्या आहारी जातच नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधीही कुठेही कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत. नशिबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी व्हा.
- माणसाने वेळेबरोबर चालावे, काळाप्रमाणे बदलावे पण संस्कारांना शेवटपर्यंत आपल्याबरोबर सांभाळावे. नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल. पण ती स्वतःची असली पाहिजे.
- समाधानाने तीच व्यक्ती हसू शकते जी दुसऱ्याचे कधीच वाईट करत नाही आणि वाईट चिंततही नाही. तसेच तीच व्यक्ती चांगले झोपू शकते जी इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. म्हणून समाधानी जीवनासाठी चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे.
- संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते. पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते.
- माणसां माणसातील नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. जर नाती चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके बसतात आणि जर ती योग्य जुळली तर आपलं संपूर्ण आयुष्य प्रकाशमय होऊन जाते. अर्थात हा सगळा योगायोग आहे.
- दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती. आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.
- कधी चुक झाल्यास माफ करा पण, कधी माणुसकी कमी करु नका. चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका.
- जीवनात अयशस्वी जरी झालोत तरी निराश होऊ नये कारण F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning असाच आहे. प्रयत्नांना कधीही शेवट नसतो कारण E.N.D. चा अर्थ Efforts Never Dead असाच घेऊयात. आयुष्यात कोणाकडूनही नकार आला तरी खचून जाऊ नये कारण N.O. म्हणजे Next Opportunity म्हणून नेहमी आशावादी राहुयात आणि जीवनात पुढेच चालत राहुयात.
- संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमीच जास्त असते.कारण संपत्ती असेल तर, फक्त विल (Will) तयार होते. जर संस्कार असतील तर गुडविल (Goodwill) तयार होते.
- जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडेच, पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर, माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने, साथ सोडल्यावर माणूस रोज, थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या, अनुभवांवर अवलंबून असतात.
- चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते, त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते.
- ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाचा द्वेष, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
- संघर्षातुन पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील. पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. स्वाभिमान आणि हिम्मत. आणि या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत, त्या रक्तात असाव्या लागतात.
- आपल्या आयुष्यात अनेक प्रश्नांची उत्तरं येत असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, काही प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात.
- गुंठा गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही.आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून रहा माणसा कारण "आयुष्य" पुन्हा मिळत नाही.
- मुंगीला वाटेत कोणी आडवं आलं तर नम्रतेनं ती बाजूनं वाट काढते. आपलं कर्तव्य विश्रांती न घेता करीत राहते. म्हणूनच तिच्या तोंडात नेहमी साखर पडते. मुंगीसारखं नम्र व कार्यमग्न असावं. नम्रतेमुळे जीवन सुखी होतं. जगण्याची गोडी वाढते.
- आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ दड़वु नका. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा. जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे. कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळविणे सर्वात मोठा सन्मान असतो.
- ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो, बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते.
- खुद से बहस करोगे तो सारे सवालों के जवाब मिल जाएंगे, अगर दुसरो से करोगे तो और नये सवाल खड़े हो जायेंगे। जब मनुष्य अपनी ग़लती का वक़ील और दूसरों की गलतियों का, जज बन जाता है तो फैसले नही फासले हो जाते है ।
- पावसाच्या निबंधाला कधीच पूर्ण गुण मिळत नसतात, कारण वाचणारा आणि लिहिणारा दोघांनीही वेगवेगळा पाऊस अनुभवलेला असतो.
- प्रत्येक माणसाने गरजेनुसार जीवन जगले पाहिजे , इच्छेनुसार नाही. कारण गरज तर गरीबांचीही पूर्ण होते, मात्र इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.
- शिक्षण हा तो दरवाजा आहे, ज्याला खोलून प्रगतीच्या वाटा खोलता येतात. पुस्तकं स्वतः बोलत नाहीत पण ज्याने पुस्तकं वाचली, त्याला ती बोलणं आणि लढणंही शिकवतात.
- स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही.
- जबाबदारीची जाणीव असणारी माणसे, फारशा सवाल- जवाबाच्या फंदात न पडता समोरील काम कसं पूर्ण करता येईल, यासाठी ते प्रयत्न सुरू करतात. म्हणूनच झिजलेले खांदे हे बोलणा-या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात.
- कर्माशी प्रामाणिक राहिलं की, पश्चातापाच्या पायऱ्या चढाव्या लागत नाही. कार्य चांगले असले तर प्रभाव आपोआपच पडतो कारण, ज्ञानाची सार्थकता आचरणातच आहे.
- एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं.. भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. विश्वास ठेवा, आनंदी रहा.
- सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत... कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.
- माफी मागून छोट व्हा पण खोट बोलून कधीच मोठ होऊ नका. गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते, ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार व सुंदर विचार असतात. दुस-याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल पण "सन्मान" देता आला पाहिजे.
- ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता, याचे 'भान'आणि भान म्हणजे कधी काय करू नये याचं 'ज्ञान'. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूसकी शिकून, माणसासारखे वागणे, म्हणजे अनुभूती.
- स्वभाव हा फ्री वायफाय सारखा असला की, कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोकं आपोआपच कनेक्ट होतं जातात. कारण, प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे.
- जगाच्या भितीने मनातील दिवे आपण जो पर्यंत विझवत जातो, तो पर्यंत आपल्या आयुष्यातील खऱ्या दीपोत्सवाला आपण मुकलेलोच असतो. यश आणि आनंद मिळवायचा असेल तर जग काय म्हणेल याची अवास्तव भीती बाळगू नये.
- काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. दु:खांच्या दिवसांमध्ये, आनंदाची आशा ठेवणारी माणसं, कुठल्याही प्रसंगी, ठामपणे उभी राहतात.
- यशस्वी होण्यासाठी "चुकणं आणि शिकणं" दोन्ही महत्वाचं असतं.
- कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं, हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे. किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं हे उमजलं तर, आयुष्य 'निसर्ग' आहे. किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य 'इंद्रधनुष्य' आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर, आयुष्य 'तारांगण' आहे. कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं, हे जाणवलं तर, आयुष्य नंदनवन' आहे. कुठे,? कधी,? किती,? काय,? केव्हा,? कसं,?याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे...
- कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहचत असेल, तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही, इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केलीय.
- जायचं कुठं हेच माहिती नसल्यावर दिशा सापडत नाही आणि जर कोणत्या दिशेने धावायचंय हे माहिती नसेल, तर आपल्या वेगाला काडीची पण किंमत राहत नाही. त्यामुळे सध्याच्या धावपळीच्या जीवनात वेगाबरोबरच दिशापण महत्त्वाची आहे.
- माणसाच आयुष्य त्या पोत्यासारखं असतं. आपल्याला ते पोतं अनुभवानं, ज्ञानानं, आणि कर्तृत्वाने भरायच असतं कारण रिकामं पोतं कधी उभा राहू शकत नाही. बाजारात त्या रिकाम्या पोत्याच्या बारदाण्याला फारशी किंमत ही नसते.
- कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही, अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला, ते महत्वाचं आहे.
- जीवनाची वाट चालताना पायात पाय घालणारी मंडळी पावलोपावली भेटतात, परंतु प्रत्येकाला डोक लावायच्या भानगडीत कधीच पडू नका, कारण जीवनाच्या प्रवासाची वाट ही खुप मर्यादीत असते.
- वाद फक्त "माझंच योग्य आहे" हे सिद्ध करण्यासाठी केला जातो तर संवाद "काय योग्य आहे" हे शोधण्यासाठी साधला जातो.
- जेव्हा आपण धाडस करतो तेव्हा शक्ती वाढते. जेव्हा आपण माणसे जोडतो तेव्हा एकता वाढते. जेव्हा आपण सामाजिक सेवा करतो तेव्हा प्रेम वाढते. जेव्हा आपण एक दुसऱ्याची काळजी घेतो आणि समानत्वाची भावना अंगी जोपासन्याचा प्रयत्न करतो तेव्हा नाते वाढते.
- खिश्यात कितीही नोटा आल्या तरी नशिबाचा टॉस करायला रुपायाच लागतो. पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की, त्याचा पत्ता आपोआप कट होतो. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात.
- राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा, प्रेम मनात ठेवून रागावणारी माणसे खूप चांगली असतात.
- जीवनात प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये.
- लोकाचे खरे सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्ये असते, पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यांमध्ये शोधत असतात.
- नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत. वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही ग्रॅनाईटवर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित व अजरामर राहते.
- जीवनात मागे बघाल तर, अनुभव मिळेल. जीवनात पुढे बघाल तर, आशा मिळेल. इकडे -तिकडे बघाल तर, सत्य मिळेल आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर, आत्मविश्वास मिळेल.
- रात्र म्हणजे कालचा काळा फळा, सकाळ म्हणजे लख्ख करणारं डस्टर होय. त्याच डस्टर ने तो काळा फळा पुसून स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे कशासाठी लिहायचे. त्याऐवजी नव्या दिवसाला नव्या कोऱ्या मनाने सामोरे जाऊन त्या फळ्यावर नवा मजकूर लिहिला पाहिजे.
- अश्रू जाणतात की नक्की आपले कोण आहे, म्हणूनच ते आपल्यांच्या सान्निध्यात ओघळतात, हास्याचे काय ते तर परक्यांशी पण इमान राखतात. कोणासोबत हसणे, ही काही फार मोठी गोष्ट नसते, ज्यांच्या जवळ मनसोक्त रडू शकतो, तीच व्यक्ती खरंच खूप महत्त्वाची असते.
- प्रामाणिक माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कसलीही चिंता . त्यांच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाची पर्वा आणि भीती नसते.
- ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
- क्षेत्र कोणतेही असो. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.
- माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही.
- आयुष्याचा शेवटचा काळ कसा जाईल, हे फक्त पैसाच नाही तर तुम्ही आयुष्यभर केलेले व्यवहार व केलेले संस्कार यांवर ठरते.
- दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसतो.. परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वाकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते.
- स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की, आनंद घेता येतो आणि देताही येतो... अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात, असे होऊ नये म्हणून, विसरा अन् माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगल. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही.
- चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण काही वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते.
- काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजवलत असतो.
- चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका... कारण ते पाऱ्यासारखे असतात.. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत. पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात.
- कोणतीही व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांमुळे येते. प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा, आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा.
- जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत. एक...आपण जन्मभर ज्या "मी" बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही. दोन...जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यांत येत नाही. तीन...क्षणोक्षणीं प्रपंचांत सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय.
- लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात.
- कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय शोधला जाईल.
- जीवनात मित्र जरूर असावेत, पण ते चालणाऱ्याला पाडणारे नसावेत, तर पडणाऱ्याला उठवून, चालायला लावणारे असावेत.
- हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा, जी गरम होते ती काच आणि जो थंङ राहतो तो हिरा. आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंङ रहा, कारण संकटात जो स्वत:ला शांत ठेवुन संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो.
- माणूस दोन पद्धतीने जिंकतो.. एकतर स्वतःच्या हिंमतीने किंवा इतरांच्या पुढं पुढं करून, मागं मागं करून. पण असं कुणाच्या मागं पुढं करून माणूस जेव्हा जिंकतो, तेव्हा त्यात स्वाभिमान नसतो आणि स्वाभिमानाशिवाय जिंकणं ही त्या माणसाची सर्वात मोठी हार असते.
- जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्रय नाही तेव्हा आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा.
- मूर्खों से तारीफ सुनने से बेहतर है कि आप बुद्धिमान इंसानसे डांट सुन लें।
- कष्टाचं तोरण हे सुखाचं जिणं शिकवतं असतं तर अपेक्षेचं तोरण हे आभासी सुखाला साद घालत राहतं. त्यामुळे माणूस आपल्या जगण्याला कशाचं तोरण लावतोय त्यावर त्याच्या आयुष्याचं सुशोभीकरण अवलंबून असतं.
- सर्वांत मोठा दानी तो असतो जो आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला या योग्य बनवतो, की त्याला आयुष्यात कधी दान मागायची गरज पडू नये.
- विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल.
- परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात. कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते, आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं.
- वाहनाची पुढची काच मोठी असते आणि मागे लक्ष ठेवायला आरसा मात्र अगदी छोटासा असतो, कारण कालचक्रात भूतकाळाला फारच थोडे महत्त्व आहे. तेव्हा मागे तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा. मात्र, भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणि पुढे जात राहा.
- मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. Confidence हे एक प्रभावी अंजन आहे, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल, त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
- प्रत्येकाची वेळ असते, तोवर त्याचा खेळ असतो, झाडा वर डौलाने मिरवणारे हिरवे पान रंग पलटताच झाड ही त्याला अलगद खाली टाकतं. प्रत्येक जण आपल्याला समजून घेईल हे आवश्यक नाही, कारण तराजू वजन सांगू शकतो पण दर्जा नाही.
- आपला व्यवहार गणिताच्या शून्याप्रमाणे आहे, असायला हवा. ज्याला स्वत:ला काही किंमत नसते; परंतु दुसन्यासोबत जुळल्याने त्याची किंमत वाढते.
- चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे.
- गलतियाॅं सुधारी जा सकती हैं। गलतफहमियाॅं भी सुधारी जा सकती हैं। मगर गलत सोच कभी नहीं सुधारी जा सकती।
- भाकरी एकच असते पण,भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास गरीब व भाकरी पचवण्यासाठी जो पळत असतो त्यास श्रीमंत म्हणतात.
- ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहत आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.
- आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात, म्हणून माणसांचे महत्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असोत वा जाणारे.
- अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली, तरी त्यावर फुलपाखरे कधीच बसत नाहीत, त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळतो. त्याप्रमाणे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो, ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं.
- माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात " सावली " म्हातारपणात "शरीर" आणि आयुष्यात शेवटच्या काळात "पैसा" कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच.
- ओळखीने मिळालेले काम खूप कमी काळ टिकतं; परंतु कामाने मिळालेली ओळख आयुष्यभर टिकते.
- कधी कधी आपण यासाठीही एकटे पडून जातो की आपण खरे बोलतो कारण; लोकांना तोंडावर गोड बोलणारी, आणि मनात पाप असणारी माणसं जास्त जवळची वाटतात.
- नका फेकू पाण्यात दगड, तेही कोणीतरी पीत असतं, नका राहू जीवनात उदास, तुम्हाला पाहूनही कोणीतरी जगत असतं.
- चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे.
- जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.
- वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजुला होतात.
- जेव्हा तुम्ही ग्रेट आणि दुसरे तुच्छ हे दाखवायचा दुबळेपणा करता, तेव्हा दुसरे ग्रेट आणि तुम्ही तुच्छ आहात हे सिद्ध करता.
- आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेले असते.
- माणुसकीच्या खेळात, त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो,जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची मने जपतो.
- परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत...कारण जीवनाचे "तत्वज्ञान" ही माणसं फक्त "शिकलेली” नसतात तर "जगलेली" ही असतात.
- झाडाने पक्षी आणि घरट्याला कितीही उन वारा पाऊस झेलत जपल तरी पक्षी एक दिवस झाडाला सोडुन ऊडुन जातात तसच माणसाच सुद्धा आहे कितीही जिवापाड जपा कितीही जिव लावा शेवटी कुणीच कुणाच नसतं त्रिवार सत्य.
- वाचणं हे पेरणं असतं, तर लिहिणं म्हणजे उगवणं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरु करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील.
- प्रेम हवंय तर समर्पण करावं लागेल, विश्वास हवा तर निष्ठा असावी लागेल, सोबत हवी तर वेळ खर्च करावा लागेल, कोण म्हणतं, की नाती फुकटात मिळतात? फुकटात तर वारासुद्धा मिळत नाही, एक श्वास पण तेव्हा मिळतो, जेव्हा एक श्वास सोडून जातो.
- कडू गोळी चावली नाही तर गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत बसू नये. त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल.
- वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत.
- काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते कारण रूतणारे काटे पावलांचा वेग वाढवितात.
- जिवनात जेवढी मोठी स्वप्न असतात, तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात, यश सुद्धा तेवढच मोठ्ठं मिळतं.
- कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहचत असेल, तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही, इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे.
- हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही, वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही, त्याचप्रमाणे सतत कष्ट करणाऱ्या व्यक्तींना कधीच अपयश येत नाही.
- लाखाची गाडी एका चावी आणि ब्रेकवर अवलंबुन असते. कोटीचे घर एका कुलूप आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारावर व स्वभावावर अवलंबून असते.
- पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं, कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते.
- राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.
- "काय चुकलं" हे शोधायला हवं, पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.आपली माणस मोठी करा,आपोआप आपणही मोठे होऊ.
- कोणत्याही संघर्षात शत्रुचे सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितुर ओळखा. पुढचा संघर्ष नक्कीच सोपा होईल .
- जपता येत नसेल तर कुरतडू तरी नये, कारण भावना मोरपिसाहूनही अधिक नाजूक व अलवार असतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काहीही नसलं तरी चालेल पण किमान सर्वांना सन्मान तरी देता आला पाहिजे.
- जी माणसं परखडपणे बोलत असतात. ती माणसं कधीच चुकिच वागणारे नसतात. मनापासून आपलेपणा जपत असतात, कारण थोडा वेळ बोलण्याचा राग येईल. पण खोट कधीच वागत नसतात.
- दुसऱ्याच्या सुखाला सुख आणि दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणारा व्यक्ती कधीच दुखी राहू शकत नाही.
- जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपर्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात, यालाच तर ऋणानुबंध म्हणतात.
- कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते.
- गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनीटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा.
- जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.
- आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला वेळ म्हणजेच आपलं आयुष्य आहे.
- सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं.
- आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही, परंतु पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात.
- कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असु दे, चेह-यावर हसू, नजरेत आपुलकी, आणि हृदयात प्रेम नसेल/ तर सर्व व्यर्थ आहे.
- आयुष्यात मोठे निर्णय घेताना भिती वाटणे हे चुकीचे नसते पण भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे हे मात्र नक्कीच चुकीचे असते कारण पत्ता माहिती नसताना सुद्धा जबाबदारी नावाचे पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते.
- जमा करुन ठेवायचंच तर लोकांचे आशिर्वाद ठेवावा, कुणाचा तळतळाट नाही. कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे. मनाप्रमाणे झाले तर, ईश्वराची कृपा आणि मनाविरूध्द झाले तर, ईश्वराची ईच्छा. दोन्हीमधे आपल्याला समाधान नक्की मिळणारच.
- वेदांचा अभ्यास करणं खुप सोपं आहे परंतु ज्यादिवशी आपण दुस-याच्या वेदनांचा अभ्यास करू त्यादिवशी ईश्वर भेटला असे समजा.
- एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात.
- परिस्थिती माणसाला मजबुर करते पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबुत करते.
- चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल, हा विश्वास मनात असला, कि येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल.
- खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले, तर दरवेळी नवीन रंग देते. पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही.
- सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसु देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.
- संयम ठेवा, संकटाचे हे ही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात, ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.
- जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात,शब्द प्रेरणा देतात. शब्द यश देतात,शब्द नातं देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं.
- ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.
- आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचे आहे. शत्रुला क्षमा द्या. प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या. मित्राला ह्रदय द्या. मुलांना तुमचं उदाहरण द्या. वडिलांना पुज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या. स्वत:ला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणार-यापेक्षा देणा-यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही ह्याला साक्षी आहे.
- आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल असा व्यक्ती सोबत असेल तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाहीत. मात्र कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही असा व्यक्ती सोबत असेल तर तुम्ही कधीही पराजित होणार नाहीत. म्हणून सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती नव्हे तर, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही असा व्यक्ती शोधायला हवा.
- समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही. पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही, तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
- शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल.
- माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते तर ते चांगल्या विचारावर असते. कारण आधार कायम सोबत नसतो पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.
- माणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे. झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्या नंतरही घाबरत नाही कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो.
- अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी, आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.
- आयुष्य हे एकदाच आहे. मी पणा नको, सर्वांशी प्रेमाने रहा. सोने वितळले की, दागिने बनतात. माती नरम झाली की, शेती बनते. पीठ नरम झाले की, पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की, लोकांच्या ह्रदयात त्याची जागा बनते.
- सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा। रुपये रखने के लिए बैंक मिल जाएगा। पर दिल की बात कहने के लिए सही मित्र और सही रिश्तेदार बडी मुश्किल से मिलते है। इसलिये मधुर संबंध बनाइये, जीवन मे हर पग पर ये ही, काम आएंगे।
- कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
- आयुष्य हे क्रिकेट सारखे असते विकेटवरती उभे राहून काहीतरी करावेच लागते भुतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ हे तीन स्टम्प आहेत आणि बॉलर म्हणजे काळ असतो टाकलेला प्रत्येक चेंडू हा मारावाच लागतो तसेच आयुष्यात प्रत्येक गोष्टीला धावा घेतली तर आयुष्यची मॅच आपण नक्कीच जिंकत असतो.
- आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात, म्हणून माणसांचे महत्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असोत वा जाणारे....
- ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो.
- कोणतीही गोष्ट आपण बघत असतो ती दिसते तशी नसते, त्याची एक दूसरी बाजू असते. म्हणून कोणत्याही गोष्टीबाबत आपले मत व्यक्त करण्याआधी चांगला विचार करावा. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत जायला पाहिजे. नाहीतर पश्चातापाची वेळ येऊ शकते.
- श्रध्देने ज्ञान मिळते, नम्रतेने मान मिळतो, योग्यतेने स्थान मिळते. वरील तिन्ही गोष्ट एकत्रीत असल्यास त्या व्यक्तिला सन्मान मिळतो.
- रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो. जीवनात स्वप्न अपलोड तर लगेच होतात, पण डाऊनलोड करता करता पूर्ण आयुष्य संपून जाते. दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका.
- पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला, तर वाफ होतो. कमळाच्या पानावर पडला, तर मोत्यासारखा चमकतो. शिंपल्यात पडला, तर मोती बनतो. थेंब तोच असतो, फक्त संगतीत फरक असतो.
- चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हि आपल्यातली योग्यता असते.
- जी लोकं दुसऱ्याचं मन दुखू नये म्हणून नेहमी काळजी घेतात त्यांचच, मन सतत दुखावलं जातं.
- लाचारी स्विकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्विकारलेला एकटेपणा कधीही चागंला.
- आयुष्याच्या पटावरचा यशस्वी राजा व्हायचे असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवा.
- व्यक्तीमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रीत चित्रपट म्हणजे आयुष्य.
- एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.
- कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नको. कारण पडणाऱ्या पावसामुळेच शेती पिकते, विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.
- जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो. तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो, तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवी हवीशी वाटतात.
- वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात.
- जीवनाच्या या प्रवासात एकच अनुभव मिळाला, आधार फार कमी लोक देतात, धक्का देणारेच जास्त असतात.
- जीवनात शांतीने जगण्याचे दोनच प्रकार आहेत. माफ करा त्यांना, ज्यांना विसरू शकत नाही आणि विसरून जा त्यांना, ज्यांना तुम्ही माफ नाही करू शकत.
- एक बार इंसान ने कोयल से कहा: तू काली ना होती तो कितनी अच्छी होती।
- सागर से कहा: तेरा पानी खारा ना होता तो कितना अच्छा होता।गुलाब से कहा: तुझमें काँटे ना होते तो कितना अच्छा होता। तब तीनों एक साथ बोले: हे इंसान! अगर तुझमें दुसरो की कमियाँ देखने की आदत ना होती तो तूं कितना अच्छा होता।
- परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परिवर्तीत होते.
- आयुष्य म्हणजे रंगांची पेटी! कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही, फक्त स्व:ताचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत... याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात.
- प्रत्येक फुल देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक नात ही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात, देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात..., क्षणोक्षणी आठवणारी.......आपल्यासारखी.....
- जेव्हा आपण गप्प राहून, सगळं सहन करत असतो, तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो, पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला, तरी अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.
- बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही "चलाखी" करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर.
- हसरा चेहरा आपला रूबाब वाढवतो, परंतु हसुन केलेले काम आपली ओळख वाढवते "मी" आहे म्हणुन "सगळे" आहेत या ऐवजी "सगळे" आहेत म्हणुन "मी" आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
- नातं म्हणजे परिक्षा नाही पास किंवा नापास ठरवायला. नातं म्हणजे स्पर्धा नाही जिंकणं किंवा हरणं ठरवायला. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता, याची जाणीव म्हणजे नातं.
- आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.
- स्वतःचं वागणं कसंही असलं तरीही, दुसऱ्याला उपदेशाचे डोस पाजत माणसं हिंडत असतात. ज्यांच्याशी जिवाभावाची मैत्री आहे, असं आपण म्हणतो, त्याची पाठ वळल्याबरोबर त्याची लगेच नालस्ती करणाऱ्यांनी समाज भरलेला आहे. अशी माणसंही इतरांना कसं वागावं, हे शिकवायला कमी करत नाहीत. म्हणूनच स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायाची असेल तर, आतूनच तो सूर उमटला पाहिजे.
- आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.
- यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशिब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो.
- जीवनाच्या प्रवासात अनेक लोकं भेटतात. काहीं फायदा घेतात काही आधार देतात. फरक ऐवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात.
- ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत, तो तोडताना दहा वेळा विचार करतो....आणि आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असो किंवा नाती.
- शाळा सार काही शिकवते लघुकोन, काटकोन, त्रिकोण, चौकोन पण आपल कोन हे मात्र परिस्थिती शिकवते.
- छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते. प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात. तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदीसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात. पण, मने मात्र कायमची तुटतात.
- आपला काडीमात्र संबध नसलेल्या विषयात कायमच डोक लावत विष पेरण्याच काम करुन क्षणिक आनंद घेणारी माणसं आपल्या कार्याला एक सामाजीक बांधीलकी व प्रतिष्ठेच लक्षण समजतात.
- माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हतारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाहीत. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळीची माणसंच.
- कावळे काव काव करुन कोकिळेचा आवाज दाबू शकतात परंतु स्वतःचा आवाज गोड बनवू शकत नाहीत. त्याप्रमाणे निंदा करणारा व्यक्ती सज्जनाला बदनाम करू शकतो पण स्वतःला सज्जन कधीच बनवू शकत नाही .
- जीवनात कुणी कितीही तिरस्कार, षडयंत्र केले तरी चांगुलपणा सोडू नये कारण चुलीतील निघणाऱ्या धूराला आकाशाला काळे करायचं सामर्थ नसतं.
- एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्याकिंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.
- वेळ, तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते.
- देवाने तर पहिलेच सांगुन ठेवले आहे. माझ्याकडे मागून मिळालं असत तर, भिकाऱ्याला भिक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिलं नसतं. त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..! फक्त निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर विचाराने मंतरलेला असेल तर, थकुन जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले सोबत कुणी असो वा नसो, पण...मनापासून कुठलही काम करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या कर्माची आठवण काढा, प्रत्येक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल...!
- चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात.
- 'हो' आणि 'नाही' हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, 'नाही' लवकर बोलल्यामुळे आणि 'हो' उशिरा बोलल्यामुळे.
- जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून धार नको आधार हवा.
- एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याचे दुर्गुण पाहत नाही. आणि एखाद्या बद्दल द्वेष निर्माण झाला तर त्याचे सद्गुण पाहत नाही. म्हणूनच माणसाला माणूस ओळखता येत नाही.
- कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून त्याच्या भविष्याची किंमत करू नका, कारण काळ हा इतका बलशाली आहे की तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो.
- साप कुठेही दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात. लोक सन्मान आपला नाही तर आपण ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.
- लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी.
- कुटूंब प्रमुखाची अवस्था ही शेडच्या पत्र्यासारखी असते. उन, वारा, पाऊस, गारा सगळे सोसून तो निवारा देतो. पण बाकीच्यांच्या मते तो आवाज खुप करतो नि गरम पण होतो ...
- कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही, हे पाहून समाधानी राहणं म्हणजेचं सुखी जीवन होय.
- सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण असत्य हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
- अहंकारात आणि संस्कारात फरक फक्त इतकाच असतो.......नेहमी इतरांना झुकविण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार.
- शेतकरी ज्वारीची पेरणी करतो त्यात कान्हीकवळी उगवते. पेरताना तर तिचं बीज त्यात नसतं. कान्हीकवळीच बी नसतं पण ती वातावरणामुळे तयार होते. तसं जन्माला येताना कुणीच वाईट नसतो, तर घडणं, बिघडणं हे तुम्ही कुणाच्या संपर्कात येता यावरच अवलंबून असतं.
- मंदिरातील घंटेला आवाज नाही, जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही, जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही, जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये, अशी श्रद्धा हवी. निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी. सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये, अशी नाती हवी.
- तुम्ही कितीही चांगले राहा. कितीही चांगले काम करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती, तुम्हाला चुकीचं समजते, ती मरेपर्यंत, तुम्हाला चुकीचंच, समजणार कारण, दृष्टीचे ऑपरेशन, होऊ शकते. पण दृष्टिकोनाचे नाही.
- माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत रहावे कारण रिकामे पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही. परिस्थिती प्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसं सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही.
- क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोड आयुष्य पुढे सरकत असते. कधी तरी, कुठे तरी केव्हातरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पाँईंट म्हणतात.
- आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो. थेंब तोच, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्यांचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबुन असते.
- चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात.
- सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
- या जगात सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही. पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसा पासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल. म्हणून चालतांना "पाऊल", बोलताना "शब्द" बघताना "दृष्टी", आणि ऐकताना "वाक्य" या चार गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत. तुम्ही मनापासून "इतरांच भलं व्हावं" ही इच्छा जर मनात आणली तर सुख तुमच्या दारी पाणी भरेल.
- गैरसमज हा खुप मोठा आजार आहे याची लागण होण्यापुर्वीच माणसाने समजुन घेण्याच्या सवयीची लस टोचुन घ्यावी अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टांपासुन दुर करतात गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही.
- आनंद पैशावर नाही तर , परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होतो.
- माणुस जेव्हा गैरसमजातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या सोईनुसार स्वःताचं तयार करतो तेव्हा नात्यांची दोर कमजोर होत जाते. बऱ्याचदा दिवा तेलाच्या कमतरतेमुळे विझतो पण आपण अनेकदा दोष वाऱ्यालाचं देतो.
- डोळे हे तलाव नाहीत, तरीपण भरून येतात. अहंकार हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो. दुश्मनी ही बीज नाही, तरीपण उगवली जाते. ओठ हे कापड नाहीत, तरीपण शिवले जातात. निसर्ग हा बायको नाही, तरीपण कधीतरी रुसतो. बुध्दी ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो. माणूस हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो.
- निसर्गाचा नियम आहे कि एका जागी दुसरी गोष्ट आली की पहीली निघुन जाते. प्रकाश आला की अंधार निघुन जातो. पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते. हवा आली की उष्णता निघुन जाते. त्याच प्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात.
- विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असतं. इतकचं की ते आपल्याला दिसत नसतं.
- परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे. इथे खोटयाला स्वीकारलं जात. आणि खऱ्याला लुटलं जातं.
- माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा परंतु अतिविश्वास विचार करुनच करावा. कारण दात आपलेच असतात, तरीही ते एखाद्या वेळेला आपल्याच जिभेचा चावा घेतात.
- जर विश्वास देवावर असेल ना, तर जे नशीबात लिहिलय ते नक्कीच मिळणार, पण विश्वास स्वःताचा स्वःतावर असेल ना; तर देव सुध्दा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.
- काहीच नसते तेव्हा अभाव नडतो. थोडेसे असते तेंव्हा भाव नडतो; आणि सगळे असते तेव्हा स्वभाव नडतो. कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, परंतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते. ज्या वेळी आपल्याला बघताच, समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे.
- कधीही नशिबावर अवलंबून राहू नये. संधी ओळखून लाभ घ्यावा.
- एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.
- सौंदर्य स्वस्त आहे पण चरीत्र महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे. मैत्री स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा महाग आहे. आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे.
- उगवता सुर्य आणि मावळता सुर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात पण दोघात फरक एवढाच आहे की, उगवता सुर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सुर्य अनुभव देऊन जातो.
- झाडांची गळून पडलेली पाने जशी परत जूळवता येत नाहीत, तसेच मनात घर करून गेलेल्या व्य़क्तीला कधीच विसरता येत नाही. घर छोटं असले तरी चालेल पण मन मात्र मोठ असलं पाहिजे. जिथे दान देण्याची सवय असते, तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
- कोकिळेचा आवाज दाबून कावळा गोड बोलू शकत नाही. त्याचप्रमाणे सज्जनाची बदनामी करून कोणीही सज्जन होऊ शकत नाही.
- जीवन त्यांचेच मस्त जे चांगल्या कामात व्यस्त आहेत. आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे, जे दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहेत.
- विनाकारण शत्रुचीं सख्यां वाढवुन वाटेत अडचणी निर्माण करून घेण्यापेक्षा नेहमी मित्राचीं संख्या वाढवुन यशाचा राजमार्ग तयार करत रहा.
- परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात.
- एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. कारण हेच की, आपल्या लक्षात आले पाहिजे की , जस जस आपण मोठे होत जातो तशा आपल्या चुका खोडल्या जात नाहीत.
- लाखाची गाडी एका चावी आणि ब्रेकवर अवलंबून असते, कोटीचे घर एका कुलूप आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारावर व स्वभावावर अवलंबून असते.
- माणसांची नाती हि गोंडस रोपांसारखी असतात, त्यांना प्रेमाचे पाणी घातले, जिव्हाळ्याचे जिवामृत दिले आणि सन्मानाचा सूर्यप्रकाश दिला तर रोप बहरू लागते, यात काटकसर केली की ते कोमेजू लागते.
- कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही, पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय, याकडे काही कुहितचींतकांचे लक्ष असते. चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.
- सन्मान विसरा पण सन्मान करणारा लक्षात ठेवा. कारण, त्याने तुमच्यातील 'चांगुलपणाची' पूजा केलेली असते. सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो आणि सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते.
- नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही. स्वतःवर कधीही अहंकार करू नका, देवाने तुमच्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.
- आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असत. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसत. तळमळ हा परमार्थाचा प्राण आहे, तर अपेक्षा न करणें हें परमार्थाचें बीज आहे आणि अनंतकाळ प्रतिक्षा करण्याची तयारी ठेवली की तात्काळ फळ मिळतें हा परमार्थातील चमत्कार आहे.
- आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळ काही कराव लागत नाही. नियती एक कोरा करकरित दिवस सुर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारे डस्टर. त्या स्वच्छ फळयावर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत नक्कीच असतो.
- शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं, त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कुणी नाही. शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा. जर स्वतःलाच ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा.
- जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसत.
- गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो. मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो. इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत मिठा मध्ये किडे पडले नाहीत परंतु मिठाई मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.
- ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका. माणुसकी कमी होत चाललीय तेवढी फक्त जपा. इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतं उद्या सुख असेल. पण माणुसकी सांगते मन खरं असेल आणि ह्रदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे.
- शब्द आणि विचार हे आपल्या मनांतील उत्पादन आहे. आपण त्यांची गुणवत्ता व वितरणाची वेळ जेवढी चांगली ठेवू तेवढे आपल्याला जास्त समाधान मिळेल.
- दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका, उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील.
- मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी! भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते, तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.
- चुकणे ही आपली प्रकृती, चूक मान्य करणे आपली संस्कृती आणि ती चूक सुधारणे हीच खरी प्रगती.
- पश्चात्ताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही, म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे.
- माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची.
- सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येऊन मनगटा वर येऊन बसते. तसेच नेहमी स्वार्थी हेतू न ठेवता निस्वार्थी भावनेने सतत काम करत रहा. लोक आपोआप जवळ येतील.
- जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण हि विसरतही येत नाही. आणि त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.
- जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते, मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो वा भूक असो.
- शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील.
- आपले जीवन शेतीसारखे आहे. आपण जीवनामध्ये ज्या प्रकारचे ज्ञान - विचार, शिक्षण व संस्कार यांच्या बीजाची पेरणी करू, त्याचप्रमाणे आपली वाणी, व्यवहार व आचरण होईल. त्यामुळे योग्य बीजाची निवड करा व जीवन समृद्ध करा.
- भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.
- काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असत कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खुप शहाणपण लागते..
- आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत.
- माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय.
- लोकांनी आपल्या भल्यासाठी दिलेला सल्ला किंवा केलेली टिका आपल्याला मान्य नसते, सहनही होत नाही. पण खोटी स्तुती, प्रशंसा जी आपल्याला बरबाद करते, ती लगेच डोक्यात जाते.
- नेहमीच शांत रहाणं कधीतरी धोकादायक ठरू शकतं. वेळेची गरज ओळखून स्वतःचं मत मांडणं खूपच गरजेचं असतं, नाहीतर आपलीच माणसं आपल्यालाच हिशोबातून वजा करायला लागतात.
- शब्दकोडी सोडवताना, बुध्दीची कसोटी लागते तर आयुष्याची" कोडी सोडवताना, सहनशक्तीची कसोटी लागते.
- चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटांवर आपल्या पंखांचे रंग देते. काही माणसे ही अशीच भली असतात. कुणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितले तरी ती समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनेने जगतात.
- नात्यात दुरावा आहे म्हणून नातं कधी संपत नाही. खूप जवळीक आहे म्हणून नातं खूप चांगले आहे असे नाही. नात्याची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं शेवटपर्यंत टिकतं. शब्द कमी व समज जास्त. तक्रार कमी व प्रेम जास्त अपेक्षा कमी व विश्वास जास्त नातं हे असंच टिकवायच असतं .
- सुखी माणसाचा सदरा कुठे विकत मिळत नाही, तर तो आपल्यालाच शिवावा लागतो. आपल्या स्वभावाच्या मापानी आणि भावनांच्या धाग्यांनी.
- थोडं झुकून नमस्कार करून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मन ही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेऊन बघा, दुःखाचा काळ निघुन जाईल. इच्छा थोड्या कमी करून बघा, आनंदाचं जग दिसू लागेल.
- परीक्षा नेहमी एकांतात असते मात्र परिणाम सर्वांसमोर असतो. म्हणून कोणतेही कार्य करण्या अगोदर त्याच्या परिणामाचा विचार नक्की करा.
- सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा.
- अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणुस एकदा अडकला की तो स्वतःच सत्व, तत्व, नाती, गोती एवढच काय, माणुसपणही विसरून जातो.
- जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते, आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे आपल्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील. पण जर आपण त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर, ते आपल्या डोळ्यात पाणी आणतील .
- पसारा सहज मांडला जातो , परंतु आवरताना जीव घेतो मग तो घरातला असो नाहीतर मनातला. ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं. दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं. विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे, कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते.
- स्वप्न थांबली की आयुष्य संपते. विश्वास उडाला की आशा संपते.काळजी घेणे सोडले की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप खूप सुंदर आहे.
- कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
- गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते.
- वास्तवात आणि विस्तवात हात घालायचा असेल तर, चटके सहन करण्याची तयारी असावी लागते.
- नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका. आयुष्यात नशिबाचा भाग हा ०% आणि परिश्रमाचा भाग १००% असतो. नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा ! यश तुमची वाट पाहात आहे.
- आयुष्य पण हॆ एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते.
- प्रत्येकाचा आदर करणे, हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे, तर एक प्रकारची गुंतवणूक आहे, ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते.
- कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
- सूख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो.
- खरं बोलून मन दुखावल तरी चालेल. पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.
- कटू सत्य आहे. गरज पुर्ण केली नाही की माणसं दूर जातात. नातं टिकून राहतं नाही. आणि आता अनुभव सांगतो. पैसा असेल जवळ तरच नाती टिकून राहतील. कारणं आताची नाती ही भावनीक नाही तर आर्थिक दृष्टीने पाहून जुळवली जातात.
- शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर भले भले डोंगर हि फोडून निघतात. माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही.
- जगात येताना आपणाकडे शरीर असते परंतु नांव नसते. जग सोडताना मात्र आपणाकडे नाव असते, परंतु शरीर नसते. आपल्याला मिळालेल्या शरीराचे नांवात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य होय.
- आपल्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर ते देण्याचा प्रयत्न करा, कारण आपण जेव्हा दुसऱ्यासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा कुठेतरी आपल्यासाठी पण काही चांगल घडत असतं.
- शिवलेल्या कापडाचा एक टाका उसवला व त्याच वेळी तो टाका मारला नाही तर सर्व शिलाई उसवते. त्याचप्रमाणे नात्यामधिल पहिला गैरसमज दूर झाला नाही तर तो एक गैरसमज सर्व नातेसंबंध खराब करतो. म्हणूनच आयुष्यातील एकमेकातील गैरसमज दुर केला तर आयुष्यभर संबंध खराब होणारच नाहीत.
- माणूस वाईट नसतो, माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्माने ती बदलता येते. वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असोत वा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात.
- एकदा मन खंबीर आणि भक्कम झालं की, शरीराची सर्व यंत्रणा एकजुटीने कामाला लागते. तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत पोहोचविण्यासाठी. कितीही चालले तरी पाय तक्रार करीत नाही. हात कितीही कष्ट केले तरी थांबत नाही. मेंदू सकारात्मक विचाराने तुम्हाला योग्य वाट आणि योग्य दिशेने घेऊन चालतो. डोळे नेहमी मार्गांत येणाऱ्या अडचणींवर तीक्ष्ण नजर ठेवून पहारा देतात. म्हणून आयुष्यात नेहमी मनाने खंबीर आणि भक्कम राहा. तुम्हाला आयुष्यात कुणीही अडवू शकणार नाही.
- अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं.
- जो धन आपने कमाया उसे आप भोग पाओ या न भोग पाओ लेकिन उस धन को कमाने के चक्कर में जो कर्म किये हैं। उन्हें तो भोगना ही पड़ेगा। इंसान जब करवट लेता है। तो दिशा बदल जाती है। लेकिन जब वक़्त करवट लेता है, तो दशा ही बदल जाती है।
- आपल्या मनातील माणसं आणि पायातील बूट जर आपल्यालाच इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. थोडक्यात त्यांच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.
- श्रीरामासारखा पती असुन ही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे पाच रक्षक असुन ही वस्त्र हरणावेळी तीचे कोणी नव्हते. राजा दशरथाला चार पुत्र असुन ही अंत समयाला जवळ कोणी नव्हते. लंकाधीश रावणा जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते. भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशैय्ये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते. अभिमन्युवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगल ठेवा, त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे.
- वेळ, तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किंमतीचे लेबल नसते. पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते.
- दुसऱ्याचं चांगल करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते तर फक्त मनात चांगली "भावना" असावी लागते.
- हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही, वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही, त्याच प्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना, कधीच अपयश येत नाही.
- माझ्यामुळे तुम्ही नाही तर,तुमच्यामुळे मी आहे, हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
- भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहेत. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही. पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.
- कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात, कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत, हा यशाचा सिद्धांत आहे.
- आई शिक्षित असो किंवा अशिक्षित, जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता तेव्हा तिच्या सारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही.
- जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे.
- बहुत मुश्किल नहीं हैं, ज़िंदगी की सच्चाई समझना। जिस तराज़ू पर हम दूसरों को तौलते हैं। कभी कभार ख़ुदको भी बैठकर देखना चाहिये। फिर हर कोई आपको अच्छा ही लगेगा।
- इतरांच भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी...! पण ज्यांच भलं झालंय त्यांच्याविषयी मळमळ नसावी...!! चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात.. काल सुद्धा हेच सत्य होत.. आणि आज सुद्धा हेच सत्य आहे. सगळी दु:ख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल. हा भ्रम आहे... मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील...!
- आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते, ह्रदय हरतं. पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
- जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पदार्थ लागतो, तो म्हणजे "आईसक्रीम". आ:आत्मविश्वास, ई: ईच्छाशक्ती, स: सकारात्मक दृष्टिकोन, क्रि: क्रियाशीलता, म: महत्वाकांशा
- खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते.... कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात.... पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही!
- जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे, जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असं म्हणतात.
- जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कुणीच संपवु शकत नाही.
- वाईट कोणीच नसतं. जीवनात अशीही वेळ पण येते की, माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे, वाईट ठरत असतो.
- प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सीजन, दवाखान्यात खुप महाग विकला जातो.
- मेहनतीने कमावलेलं आणि आयते मिळालेलं यातला फरक ज्यांना कळतो.. त्यांनाच आयुष्य जगण्याचा खरा अर्थ समजतो.
- संयम हिच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेऊन काम कराल तेवढेच तुमचे यश मोठे असेल.
- मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला. मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला. मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला.
- रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वत:ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो.
- माना की हर तकलीफ से इंसान का दिल दुखता बहुत है पर, हर तकलीफ से इंसान सीखताभी बहुत सही मौके पर खड़े होकर बोलना एक साहस है।उसी प्रकार खामोशी से बैठकर दूसरों को सुनना भी एक साहस है।
- स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं,कधीही चांगलं.
- असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.
- एखाद्याशी असलेलं खरं नातंं हे एखाद्या चांगल्या पुस्तकासारखं असतं कारण ते कितीही जूनं झालं तरी त्यातील शब्द मात्र कधीही बदलत नाहीत.
- आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
- आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे. तेव्हाच तर कळतं, कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येतंय.
- गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनीटांमध्येच.आपण एकत्र घालवलेल्या' शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.
- लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात, पण ऐरण कायम टिकून रहाते अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात पण जे घाव सहन करतात ते कायम अभंग राहतात.
- पानगळ झाल्याशिवाय, झाडाला नवी पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगांचा, सामना केल्याशिवाय, चांगले दिवस येत नाहीत.
- देवाने तर पहिलेच सांगुन ठेवले आहे. माझ्याकडे मागून मिळालं असतंक्षतर, भिकाऱ्याला "भिक" आणि शेतकऱ्याला "पीक" कधीच कमी पडू दिलं नसतं. त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे. फक्त निवडलेला "रस्ता" जर "इमानदारीचा" व सुंदर विचाराने मंतरलेला असेल तर,"थकुन" जाण्याचा प्रश्नच "उरत" नाही. भले "सोबत" कुणी असो वा नसो. पण...मनापासून कुठलही काम करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या कर्माची आठवण काढा, प्रत्येक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल.
- स्वतःची स्तुती आणि इतरांचे दोष यावर बोलणं सोडता आलं, तर प्रगतीच्या अनेक वाटा, दृष्टिपथात येतील.
- सर्वच ज्ञान अभ्यासातून मिळत नाही. काही वेळा भेटलेली माणसे आणि तुटलेली नाती खूप काही शिकवून जातात.
- कुणी आपली निंदा करो किंवा प्रशंसा दोन्ही बाबी चांगल्याच आहेत. टीका केली गेली तर सावध होण्यासाठी वेळ मिळतो आणि प्रशंसा केली गेली तर पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणाच मिळते.
- ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो.
- जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरे जा कारण रोज पडलेल्या उन्हाने समुद्र काही आटत नाही. मन स्थिर असेल तर विचार भटकत नाहीत. आणि स्थिर विचार यशाचा रस्ता चुकून देत नाहीत.
- नातं तेच टिकते, ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
- संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पहायला हवं. प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जीवन जगायला हवं.
- परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा, परिस्थिती बदलविणारी माणसं सांभाळा. आयुष्यात कधीही आपल्याला अपयश अनुभवायला मिळणार नाही.
- वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, दोन्ही बदलणार आहे.
- आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये. आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली कि उत्तर मनासारखे येते. आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा, आणि भागाकार करताना स्वत:व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले कि उत्तर मना- जोगते येते.
- कहो उसी से जो कहे ना किसी से, मांगो उसी से जो देदे तुम्हे खुशी से, चाहो उसे जो मिले किस्मत से, रिश्ते बनाओ उसी से जो निभाये हंसी से।
- बदलना तय हैं, हर चीज़ का इस संसार में। बस कर्म अच्छे करें। किसीका जीवन बदलेंगा, किसीका दिल बदलेंगा और किसी के दिन बदलेंगे।
- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा असतो... एक स्पर्धक आणि एक निंदक.. दोघेही आपल्यामध्ये स्पर्धा जिंकण्यासाठीची जिद्द निर्माण करतात.
- गुंता झाला की तो संयमाने हळूहळू सोडवावा, मग तो दोर्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो, आणि आपणही. आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलतां आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नाही.
- शांत बसून आपले कार्य पूर्ण करणाऱ्या माणसातच संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते.
- वेळ, विश्वास आणि मानसन्मान हे असे पक्षी आहेत की, हे जर उडून गेले की पुन्हा येत नाहीत.
- जीवन जगताना वेदना कमी करायच्या असतील, तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे. एक- काहीही आपलं नाही. दोन- काहीही आपलं नव्हतं. आणि तीन- काहीही आपलं राहणार नाही. बस जीवनच संमृद्ध होणार आपले.
- जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते, तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.
- माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात.
- प्रगती करत असताना अंगी, मेहनत आणि धाडस असायला हवं. त्यासाठी वेगळा काही करण्याची गरज नाही. बेधडक आणि प्रामाणिक पणे मेहनत केली की प्रगती नक्कीच होते.
- प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्यसंपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण चारित्र्य हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते, तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते.
- संघर्षातुन पळ काढाण्यासाठी हजारो कारणे सापडतील. पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात स्वाभिमान आणि हिम्मत आणि या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत, त्या रक्तात असाव्या लागतात.
- समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
- जेव्हा मन कमकुवत असते, तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते. जेव्हा मन संतुलित असते, तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते. जेव्हा मन खंबीर असते, तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते. जेव्हा मन विश्वासाने आनंदी असते, तेव्हा परिस्थिती निश्चित विजयच निर्माण करते.
- पानी अगर मर्यादा तोड़े तो विनाश होता है और मी वाणी मर्यादा तोड़े तो सर्वनाश होता है।
- जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण,उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.
- माणसातला मी हा मोठा गंमतीदार प्रकार आहे. त्याला स्वतःची हार पाहायला आवडत नाही. आपलं मत चुकीचं असलं तरी तेच खरं असं, दामटून नेण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. पण खरा विवेकी तो की, जो आपल्याला आवडो अथवा नाआवडो पण सत्याचीच बाजूच ही आपलीच बाजू आहे असं मानतो.
- वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते. वळणा-वळणाचे आयुष्य असावे. त्यात काटेही असावे. वेदनाही असावी पण विश्वास तोडणारं.., कोणी नसावं.
- असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.
- देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता, यावर ब-याच गोष्टी अवलंबून असतात.
- जिंदगी एक बार ही मिलती है। बिल्कुल गलत है। सिर्फ मौत ही एक बार मिलती है। जिंदगी हर रोज मिलती है। इसलिए जिंदगी जी भर के जिओ। समय और समझ दोनों एक साथ किस्मत वालों को ही मिलते हैं, क्योंकि अक्सर समय पर समझ नही आती और समझ आने पर समय निकल जाता है।
- आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही, असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानस SMILE दया. हे छोटस हास्य इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच मौल्यवान आहे.
- स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की, कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही, लोकं आपोआपच कनेक्ट होतं जातात. कारण, प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असण महत्त्वाचं आहे.
- माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.
- स्वतःचा आधार स्वतः असलं की, नको तिथं खचून जाणे कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण? यापेक्षा, आपल्यासाठी आपणच हे समजले तर, कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल.
- जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो; कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते.
- यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत रहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या मागे येते, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.
- आपल्या जीवनातील दुःखाच्या वेदना कमी करायच्या असतील, तर आपण तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली काहीही आपलं नाही, दुसरी काहीही आपलं नव्हतं आणि तिसरी म्हणजे काहीही आपलं राहणार नाही.
- दु:ख सोडून दयावे, निर्माल्य बनून जाते. आनंद पेरत जावा, समाधान बनून रहाते. पारखून घेतले तर कोणीच आपले नसतात. आणि समजून घेतले तर कोणीच परके नसतात.
- स्वभाव म्हणजे रंगांची पेटी! कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्व:ताचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत, याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात.
- सहकुटुंब घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते. कारण तो व्यक्ती स्वत:कडे जे काही आहे, त्यात सुखी आणि आनंदी असतो. त्यामुळे इतरांचे वाईट व्हावे, हा विचार तो कधीच करत नाही.
- जीवनातील प्रत्येक समस्या ही वाहतुकीच्या लाल दिव्याप्रमाणे असते. आपण थोडा वेळ प्रतीक्षा केली, तर सिग्नल हिरवा बनतो आणि मार्ग सापडतो.
- जीवनात अडचणी त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते. आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत, ते जिंकतात किंवा शिकतात.
- एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर, तुम्ही त्यांंच्या पेक्षा खूप चांगले आहात. कारण दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्या कडे आहे आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा(दानत) आपले मध्ये येणे, हे आपले भाग्य आहे.
- आशा सोडायची नसते. निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर, हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.
- वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात, वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो ; आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
- जिवनात कठीण परीस्थिती सुद्धा एका वाँशिंग मशीन सारखी आहे. जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा पण जेव्हा आपण त्यातुन बाहेर येतो, तेव्हा आपल व्यक्तिमत्व पहिल्या पेक्षा, अधिक स्वच्छ, चांगल आणि चमकदार असतं.
- भावना कळायला मन लागतं. वेदना कळायला जाणीव लागते. देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगायला सुंदर विचार लागतात. आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही, तर सुखी, समाधानी व निरामय आयुष्य लागतं हे मात्र नक्की.
- आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
- माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते.
- सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. कधी प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून, तर कधी ते सुयोग्य कृतीतून घडत असते. म्हणून आपण नेहमी सकारात्मक असावे, आनंदी असावे.
- स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं.
- पाण्याच्या एका थेंबासारखं जीवन आहे माणसाचं पण अहंकार मात्र समुद्राएवढा आहे.
- हसणे फार सुंदर आहे. दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे. जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे.
- चांगली वस्तु, चांगली माणसे आणि चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत.
- आयुष्यात तीन संघर्ष असतात. जगण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष.
- ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळालय.
- विश्वास हा खोडरबरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
- चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
- परिस्थिती हा सर्वात मोठा गुरू आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही.
- देणं सुरू केलं कि येणं सुद्धा आपोआप सुरू होतं, मग तो सन्मान असो वा धन.
- कधी कधी उसवलेल्या नात्याला फक्त शब्दांचं ठिगळ पुरेसं नसतं. त्यासाठी संयमाच्या सुईत, संवादाचा धागा पेरून, प्रेमाचा रफू सुध्दा करावा लागतो.
- कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला अनं पचवायला मन तितकचं मोठं आणि समजूतदार लागतं.
- मााणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दुःख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसे आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणूस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे आणि सर्वात महत्वाचे वेळ सांगते नाते कसे आहे.
- काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात. काही माणसे गरिबीला गुलाम करतात. माञ. जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात.. तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात.
- वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे.. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल.
- माणसाला स्वत:चा Photo काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची Image बनवायला काळ लागतो.
- चांगल्या कामाला मांजरीपेक्षा माणसंच जास्त आडवी येतात.
- साधेपणा ही सगळ्या पेक्षा चांगली सुंदरता आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
- ज्या दिवशी माणूस समजेल की, समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा वेगळे आहेत. त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील.
- वेळेनं दाखवलं. काळानं शिकवलं. नकारांनी वाढवलं. अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली. अनुभव आले आणि राहिले. त्यांच्यापेक्षा मोठा गुरू कोणी नाही.
- शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाय चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखे उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतावर विश्र्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ तुमची असेल.
- स्वप्न थांबली की आयुष्य संपते. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणे सोडले की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या.
- ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
- आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
- तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला खूप अडचणी आहेत, पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की, तुमची स्वप्ने किती मोठी आहेत.
- प्रत्येकाच्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात.एक म्हणजे तुम्ही चुकलात तर ती चुक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे , आणि दुसरे असतात ते म्हणजे तुमची एक चूक कधी होईल आणि तुम्ही कधी लोकांच्या नजरेत वाईट होणार ह्याची वाट बघणारे .
- Attitude दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, Smile देऊन बघा, आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही.
- तुम्ही स्वतःवर काम करण्याची गरज आहे.जोपर्यंत तुम्ही स्वतःच मन सकारात्मक भावनांनी काठोकाठ भरून टाकत नाही तोपर्यंत तुम्हीं इतरांना काही देऊ शकत नाही.जोपर्यंत तुम्ही स्वतः भरलेले नाहीत तोपर्यंत इतरांना काय देणार ?
- दिवसभराचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे दोन घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत.
- आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस. येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात.
- कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते नाहीतर त्यांचा डोक्यावर विपरित परिणाम होतो.
- लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात. खरंय माणसाकडे जे असतं, ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच तेच हवं असतं.
- जिथे आपण ठेच लागून पडतो तिथुनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही.
- कुणी आपली निंदा करो किंवा प्रशंसा. दोन्ही बाबी चांगल्याच आहेत. टीका केली गेली तर सावध होण्यासाठी वेळ मिळतो आणि प्रशंसा केली गेली तर पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणाच मिळते.
- हरलो तरी चालेल पण मैदान गाजवता आले पाहीजे. मग समोर कोणीही असो पुढच्या वेळेस नाव ऐकून विचारच केला पाहीजे.
- अहंकार कोणालाच चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात. एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं, तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं. आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो. तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो.
- कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते, कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले कपटी,चारित्र्य लपू शकत नाही.
- माझ्या मुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे, ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यासाठी असावे, जेवणातल्या मिठासारखं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जाणार नाही.
- पद, प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील.
- माना की हर तकलीफसे इंसान का दिल दुखता बहुत है पर, हर तकलीफसे इंसान सीखताभी बहुत है। सही मौके पर खड़े होकर बोलना एक साहस है, उसी प्रकार खामोशी से बैठकर दूसरों को सुनना भी एक साहस है।
- मी मोठा की तू मोठा यातच आयुष्य संपून जात. सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय. हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल. स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे. रक्त गट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे..
- तुटलेल्या काचा कितीही ही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच, तशीच नाती असतात, एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपवा शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमा होताच.
- आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग आणि अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.
- ज्या व्यक्ती जवळ संयम, समाधान, आणि सहनशिलता असते. त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. जे लोक आपली बदनामी करतात, त्यांना करू द्या. कारण बदनामी तेच लोक करतात, जे आपली बरोबरी करू शकत नाहीत. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना नेहमी शांतपणे ऐकून घ्यावे. वेळच त्यांना योग्य उत्तर देईल.
- भावना कळायला मन लागतं. वेदना कळायला जाणीव लागते. देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही, तर सुखी, समाधानी व निरामय आयुष्य लागतं.
- चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही. शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे.
- मनाला जिंकायचे असते भावनेने, रागाला जिंकायचे असते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते धीराने, संकटाला जिंकायचे असते धैर्याने, आणि माणसाला जिंकायचे असते, माणुसकीने.
- आयुष्याच गणित फार विचित्र असतं. चुका केल्याशिवाय अनुभव मिळत नाहीत आणि अनुभव मिळाल्याशिवाय काय चुका केल्यात, हे पण कळत नाही. म्हणजे चुकाना ही महत्त्व आहेच. माणसं उगाचच चुकांचा बाऊ करुन माणसां माणसाची नाती तोडायला तयार होतात.
- टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात. जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
- निवड, संधी आणि बदल या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही.
- वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोका कड़े लक्ष्य देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेची चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरु नका.
- मला कोणाची गरज नाही, हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे, हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
- जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतलं की माणूस आयुष्यभर थकत नाही.
- फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य किरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.
- दु:ख सोडून दयावे, निर्माल्य बनून जाते. आनंद पेरत जावा. समाधान बनून रहाते. पारखून घेतले तर कोणीच आपले नसतात आणि समजून घेतले तर कोणीच परके नसतात.
- पैशांची श्रीमंती ही नशेसारखी असते. ज्याला चढते तो लोकांना किंमत देत नाही अणि ज्याची उतरते त्याला लोक किंमत देत नाही. पैसा हे जगण्याचे एक साधन आहे, जीवन नव्हे.
- चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं कारण जीवनातील गेलेले क्षण कधीच परत येत नाहीत. नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडूनही उसने मिळत नसते, ते स्वतःच निर्माण करावे लागते. सुखाच्या व्याख्या खूप आहेत, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे.
- आपण दररोज रोपांना पाणी देतो. पण फळ, फुले फक्त त्या त्या ऋतूमानाप्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार.
- हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही, वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही, त्याचप्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कधीच अपयश येत नाही.
- समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली, तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.
- चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल.
- जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरे जा. कारण रोज पडलेल्या उन्हाने समुद्र काही आटत नाही. मन स्थिर असेल तर विचार भटकत नाहीत. आणि स्थिर विचार यंशाचा रस्ता चुकून देत नाहीत.
- संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते.
- आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती.
- प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात...एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका.
- आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचे सोडायचं नसतं. कारणं काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की.
- दुःख गिळून आंनद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वत: जगुन दुसऱ्यांना जगु देणे म्हणजे सहानुभूती. आणि माणुसकी शिकुन माणसा सारखे वागणे म्हणजे सखाची अनुभुती.
- गलत लोग आपकी अच्छाई से भी नफरत करते हैं और सही लोग आपमें बुराई जानकर भी आपसे प्यार करते हैं। यही सम्बन्ध की परिभाषा है ।
- अच्छा बनना और अच्छा होना मेँ ज़मीन और आसमान का फ़र्क है। लोग अच्छा बनने के लिये न जाने, कितने अच्छे लोगोँ की ज़िन्दगी से खेल जाते हैँ और जो अच्छे होते वो हज़ारों की ज़िन्दगियाँ बना जाते हैँ।
- आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर, प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात. आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणी मध्ये संधी दिसेल.
- परिस्थितीशी जुळवुन घेण्याची मानसिकता असली की आयुष्याचा प्रवास सुरळीत होत जातो. शब्द मोफत असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.
- स्वतःवरती विश्वास ठेवा एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ तुमची असेल.
- जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च धेय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते. आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते.
- पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण, माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजुन तरी सुरु झालेली नाही. म्हणून नाती जपा. आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात तेच खरे आपले असतात.
- आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिंमत कधीही कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते.
- स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत, कदचित ती आश्रूंबरोबर वाहून जातील. ती ह्रुदयात जपून ठेवावीत,कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका, ही स्वप्ने पुर्ण करण्याची प्रेरणा देईल.
- जबाबदारीची जाणीव असणारी माणसे सवाल - जवाबाच्या फंदात न पडता समोरील काम कसं पूर्ण करता येईल यासाठी ते प्रयत्न सुरू करतात. म्हणूनच झिजलेले खांदे हे बोलणा-या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात.
- समोरच्या ने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. आणि तो विश्र्वास कायम निभावणे ही आपली जबाबदारी आहे.
- भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणार्या लोकांपासून सावध राहायला पाहीजे. कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे नाही.
- प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही.
- आयुष्यात योग्य वेळी, आणि योग्य स्थळी जो दिवे लावतो, त्याची आयुष्यभर दिवाळी असते.
- नारळ असो वा माणूस नासका निघाला म्हणून शोक नाही करायचा उलट तो पावलाय समजून बाजूला करायचा.
- काय बोलावे, हे ज्ञान ठरवते. कसे बोलावे, हे कौशल्य ठरवते. किती बोलावे, हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी, हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते.
- इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात.
- पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत: च्या पाहण्यावर विश्वास ठेवा.
- संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे.जेवढा वेळ तुम्ही संयम ठेऊन काम कराल, तेवढेच यश ही मोठेचं असते. कुणाला दुखावून मिळविलेला आनंद, कधीच सुख देऊ शकत नाही. पण कुणाला आनंद मिळावा,म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो.
- भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. ही भावना ज्या माणसाजवळ असते, तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. जीवन जगतांना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा, कोणीतरी आपली आठवण काढली पाहिजे.
- आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.
- जपणं आणि साठवणं यात फार मोठे अंतर असते. साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती माणसं. कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा, आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोप्प होतं.
- खुर्चीवर बसून स्वता: ऊब घेण्यापेक्षा, तुम्ही खुर्चीवर बसल्याने किती लोकांना ऊब मिळाली हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या खुर्चीवर किती काळ बसलाय यापेक्षा तुम्ही खुर्चीवर बसून किती माणसांचा काळ बदलला किंवा किती माणसांवर काळ आला हे महत्त्वाचे आहे.
- संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे, दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखाल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही.
- तुमचं नाण नुसतं खरं असून चालत नाही.तर वाजवून दाखवण्याची कला पण तुमच्या अंगी असायला हवी.....नाहीतर त्याची योग्य किंमत मिळत नाही.
- सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत. वारंवार येतील आणि जातील. जर ते आलेच् नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार. जीवन खुश राहून जगायला शिका कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच् मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणा कणाने कमी होत जाते.
- पंगत चुकली तर एक वेळेचे जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते.
- सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर, काहीजण आपल्याकडे बोट ही दाखवतील. क्यों की,जब तक जिंदा है,तब तक निंदा है।
- आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या नसतात कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं.
- ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता.
- वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका.
- जीवनातील प्रत्येक समस्या ही वाहतुकीच्या लाल दिव्याप्रमाणे असते. आपण थोडा वेळ प्रतीक्षा केली, तर सिग्नल हिरवा बनतो आणि मार्ग सापडतो.
- जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपली जवळची असतात,आणि जी माणसं आपल्या चौकश्या करतात ती माणसं कधीच आपली नसतात.
- चिकूची बी फळात राहूनही चिकू पिकल्यानंतर स्वच्छंदपणे अलगद बाहेर पडते. आंब्याची कोय मात्र रसात इतकी गुरफटून जाते की, फळ पिकलं तरी गर-रसातून आलग होत नाही, परिणामी तीला लोक पुर्ण चोखल्याशिवाय फेकून देत नाहीत. म्हणून माणसाने चिकूच्या बी सारखं वागावं सगळ्या मोहजाळात राहूनही योग्य वेळी चकचकीत बाहेर पडावं. कोयीसारखं मायारुपी रसात गुरफटून रहाल तर लोक पिळून चोथा करुन फेकल्याशीवाय राहणार नाहीत.
- या जगात सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही, पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसा पासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल. म्हणून चालतांना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य या चार गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत.
- अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाच नाही तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे.
- आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.
- जितके मोठे मन तितके सोपे जीवन... वादाने अधोगती संवादाने प्रगती... जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात.
- समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे.
- अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला, तर फक्त सल्ला देऊ नका. साथ द्या, कारण सल्ला चुकीचा असू शकतो पण साथ नाही.
- असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की, नसलेल्या गोष्टींचे दुःख कधीच जाणवत नाही.
- दीन दुबळ्यांना कधीही त्रास देऊ नये, कारण ते कोर्ट किंवा कचेरीत जाऊन न्याय मागत नाहीत तर देवाच्या न्यायालयात जाऊन न्याय मागतात. आणि देव जेव्हा न्याय करतो त्यावेळी तिथे कोणताही पुरावा, साक्षीदार, लाच, धनसंपत्ती, पाठबळ चालत नाही. याकरीता देवत्वाला प्राधान्य देऊन तो सर्वव्यापी आहे हे नेहमी स्मरणात असायला हवं.
- घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो. म्हणून शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका.
- निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होतं असते. जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात धावून जात असते. जसं गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही तसं निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही.
- कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक जुनी म्हण आहे. जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.
- जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं, थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते. उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं.
- जे तुमची काळजी करतात त्यांना कधीही दुर्लक्षित करू नका कारण गारगोट्या जमा करण्याच्या नादात तुम्ही मौल्यवान हिरे गमवाल.
- जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो. काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
- ज्याप्रमाणे सुर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे. तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.
- धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
- ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं ?, दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच? दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे. आतून रडता नाही दुस-याला हसवायचं. ह्यालाच जगणं म्हणतात.
- कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना जास्त प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला सल्ल्याची नाही तर आधाराची गरज असते.
- जीवनातील समस्यांची दोनचं कारणं असतात, विचार न करता कर्म करणे व कर्म न करता फक्त विचार करणे.
- या जगात सर्वात मोठी संपत्ती बुध्दी सर्वात चांगल हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामुल्य आहे.
- ज्याला दुःखातुन सुटका पाहीजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे.
- बर चाललय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो. पण "खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात" हे सांगायला जवळचाच माणूस लागतो.
- जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात.
- ज्या प्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते.
- खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात. पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…!
- स्वत:च्या तोंडाने खूप मोठेपण सांगून माणूस मोठा होत नसतो...!तो कसा आहे ते त्याच्या वागण्यावरून व कृतीवरून लोकांना दिसून येते असते.
- कोणालाही न दुखवता जगणं त्यांच्या इतकं अतिसुंदर कर्म जगात दुसरे नाही. हे ज्याला कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही.
- वेळ फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो. वेळ खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोई प्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.
- आदर अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि; मैत्री अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
- बोलणारे ओठ कोणतीही समस्या कमी करू शकतात, बंद ओठ काही समस्या टाळतात, परंतु हसरे ओठ अनेक समस्या कायमच्या सोडवू शकतात.
- ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका.
- चांगले चरित्र व संस्कार बाजारात मिळत नाहीत, तर ते आपल्या संघर्ष व सत्कर्माने मिळवावे लागतात.
- जितके मोठे मन तितके सोपे जीवन... वादाने अधोगती संवादाने प्रगती... जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात.
- शिक्षक आणि ड्रायव्हर दोघांत एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात. परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवतात.
- आयुष्यातील सर्वात सोपा नियम म्हणजे जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करु नका.
- मुंगी केवढीशी....!, त्या मुंगीच डोकं केवढसं....!, त्या डोक्यातला मेंदू केवढासा...!, तरीपण त्या मुंगीला बरोबर कळतं......, कुठल्या गावातल्या, कुठल्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर, किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे, हे सांगावं लागत नाही तिला. मुंगी" कणभरच असते पण....मनंभर साखर फस्त करते. सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं.
- छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते. प्रेम असो वा नसो, भावना शुध्द असाव्या लागतात.
- तोडु नयेत दुसऱ्याची मने झाडाच्या फांदीसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण, मने मात्र कायमची तुटतात.
- दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दिपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. जी माणसं, माणसं जोडतात,तीच आयुष्यात यशस्वी होतात.
- जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करु नका. कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येतं.
- आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
- शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहीजे. कारण लोक चेहरा विसरतात. शब्दांना नाही विसरत.
- यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. -डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
- हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळाली असती तर Compromise काय असते ते कधीच कळलं नसतं !
- घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते, शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही भाव असतो. पण माणूस रस्त्यावर आला की त्याची किंमत संपते.
- जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो.
- कुछ लोग हमेशा ख़ुश व संतुष्ट रहते हैं, इसलिए नहीं की उनके जीवन में सब कुछ ठीक होता है, बल्कि उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है। अच्छी सोच, अच्छी भावना और अच्छा विचार मन को हल्का करता है।
- भूतकाळाचा जास्त विचार करू नये, डोळ्यात पाणी येईल, भविष्याचीही काळजी करू नये, मनात समस्या निर्माण होतील, पण वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेलात तर, जीवनात आनंद निर्माण होईल.
- आनंद शोधू नका. आनंद निर्माण करा कारण आनंद निर्मीती वर GST 0% आहे. स्वतःचा शोध स्वतःमध्ये घ्या. बाकी सगळ Google वर आहे.
- स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. जर दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते. ताकातच लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. सुख सुध्दा माणसाच्या स्वत: जवळच असते त्याला फक्त शोधण्याची गरज असते .
- आयुष्य प्रवास आहे, स्पर्धा नाही जीवनात येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिका. दुःख द्यायला तर आपलेच टपून असतात.
- आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर, स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडल तर नात्याला फायदा.
- आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
- प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा.
- जीवनात चुका, अपयश, आणि नकार हे आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे. यांना सामोरे गेल्याशिवाय यशस्वी आयुष्य जगता येतं नाही. यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ती आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.
- एक पेन चुक करू शकतो. पण एक पेन्सील कधीच चुक करत नाही. कारण तीचा पार्टनर (खोडरबर) तीच्या सोबत असतो. तो तिच्या सर्व चुका सुधारतो. म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा जो आपल्या चुका सुधारेल.
- सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही, परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल.
- आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
- जे नशिबात आहे ते तुम्ही टाळू शकत नाही. बटाटे घेताना जे बटाटे खराब म्हणून तुम्ही वेगळे काढता तेच तुम्हाला समोसे आणि पाणीपुरी मध्ये परत मिळतात.
- अभ्यासासाठी सुंदर हस्ताक्षराची गरज नाही, हे कुबुध्दी न जाणे माझ्या मनात केव्हा निर्माण झाली आणि ही कुबुध्दी मी अगदी विलायतेत जाईपर्यंत माझ्या मनात घर करून राहिली. मी जेव्हा आफ्रिकेत गेलो, तेव्हा तेथील वकील व नवयुवकांची मोत्याच्या दाण्यांसारखी अक्षरे पाहिली आणि खजिल झालो, अन् पस्तावलो. हस्ताक्षर खराब असणे म्हणजे अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे, हे मला पटले. प्रत्येक तरूणाने व तरूणीने लक्षात ठेवले पाहिजे की, शिक्षणासाठी सुंदर हस्ताक्षर असणे आवश्यक आहे. मी तर बालकांना आधी हस्ताक्षर सुधारा, मग शिका असाच सल्ला देईन. लहानपणीच बालकांनी अक्षर सुंदर काढण्याचा त्यांचे अक्षर छापील शकेल. सराव केला, तर अक्षरासारखे होऊ. - महात्मा गांधी
- जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो; कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते.
- माणूस किती विचित्र आहे प्रार्थनेच्या वेळी विचार करतो, की देव किती जवळ आहे आणि अपराध करतेवेळी विचार करतो, की देव किती दूर आहे.
- सतत तोंडात साखर आणि मस्तकी बर्फ ठेवावे, जीवन हे मर्त्य आहे. नेहमी लक्षात ठेवावे. प्रत्येक क्षण हेच जीवन, हेच मनात ठसवावे, आयुष्य आनंदात जगावे.
- कर्माने माणसाला ओळख मिळते, नाव काय आहे? नाव तर लाखो लोकांचे एकसारखेच अस
- ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध सिद्ध करावा लागत नाही, त्याच प्रकारे मनुष्याचे गुण ते सांगावे लागत नाही.
- स्वतःच्या गरीबीची लाज कधीच वाटू देवू नका. कारण, पैसा कमी असला तरी आई-वडीलांची मेहनत कधीच कमी नव्हती.
- आयुष्य म्हणजे रंगांची पेटी! कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही, फक्त स्व:ताचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत... याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात.
- कष्ट करा पोटभर मिळेल. विश्वास करा प्रेम मिळेल. सेवा करा सुख मिळेल. मदत करा फळ मिळेल. कल्पना करा मार्ग मळेल. भक्ती कराआशिर्वाद मिळेल. दोस्ती करा साथ मिळेल. दान करा धन मिळेल. आदर करा सन्मान मिळेल. सत्कार करा संस्कार मिळेल.
- किंमतीवरून नाही हिमतीवरून ओळखा. शब्द फिरवणारे लाख मिळतील पण, शब्द पाळणारा एखादाच मिळेल.
- समजूतदार व्यक्तीसोबत काही मिनीट केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचन्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
- राग व व्देष व्यक्त करणे कमकुवत व्यक्तीच्या शक्तींचे शक्तीहीन प्रदर्शन असते. शांत स्वभाव आणि चांगले विचार हे प्रगल्भ व्यक्तीचे लक्षण व मोठेपण; तेच त्याची शक्ति प्रतिबिंबित करतात आणि यातच त्याचा जय लपलेला असतो. म्हणून माणसाने कधीही रागवू नये; आपला राग हा नेहमीच शत्रुचा मित्र असतो; आणि कधीही दुसऱ्याचा द्वेष करू नये कारण तो आपल्या जीवनातील दोष ठरतो.
- खुर्चीवर बसून स्वता: ऊब घेण्यापेक्षा, तुम्ही खुर्चीवर बसल्याने किती लोकांना ऊब मिळाली हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या खुर्चीवर किती काळ बसलाय यापेक्षा तुम्ही खुर्चीवर बसून किती माणसांचा काळ बदलला किंवा किती माणसांवर काळ आला हे महत्त्वाचे आहे.
- प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाला सर्वकाही माहित नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहित असते.
- जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं.
- जीवन में सत्य, निष्ठा और हौसले के साथ आगे बढे तो हर मुश्किलें हार जाती है।
- दूसरों से ईर्ष्या करेंगे तो मन अशांत हो जाएगा। किसी इंसान से या किसी बात से डरने या अनावश्यक चिंता करने से भी शांति दूर हो जाती है।
- जब तक अभ्यास नहीं किया जाता है, तब तक ज्ञान का कोई अर्थ नहीं है, अभ्यास के बाद ही ज्ञान का लाभ मिलता है।
- मुलगा आई- वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो.
- आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका.
- कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली.
- स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून त्यानेच पाटी लिहिली, "स्त्रियांना येथे प्रवेश नाही". कमाल आहे माणसा तुझी.
- चांगुलपणा हा माणसाचा सद्गुण आहे. आपण तो जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम प्राप्त होईल.
- दुसऱ्यानी चांगले म्हणावे ही अपेक्षाच चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता आले पाहिजे.
- आपण जे काही करतो आहे ते बरोबर आहे की चूक आहे, हे आपले अंतर्मन नेहमीच सांगते. त्यामुळे त्याला फसवता येत नाही.
- प्रत्येकालाच आपण आवडतो असे कधी होत नसते. त्यामुळे स्वतःशीच प्रामाणिक असणे गरजेचे असते.
- चांगल्या वाईटांची व्याख्या ही व्यक्तीपरत्वे बदलत असते. ज्याला आपण फायद्याचे ठरतो तो आपणाला चांगला समजतो आणि ज्याला अडचणीचे ठरतो त्याच्यासाठी वाईट ठरतो. मग त्या ठिकाणी आपण बरोबर असलो तरीही !
- सगळ्यानाच खुश ठेवणे शक्य नसते म्हणून आपण स्वतः प्रामाणिक भूमिका ठेवायची, मग कुणी काहीही म्हणो. आपण आपलं चांगल काम चालूच ठेवायचं, फक्त आपल्यातला चांगुलपणा कमी होऊ द्यायचा नाही.
- जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.नाती मोठी नसतात तर,ती सांभाळणारी माणसे मोठी असतात.
- चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात.चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनात टिकतात.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421
====================================