⚜️उतारा वाचन भाग ६७⚜️
एकदा आमच्या घरमालकांनी गाय आणली. अंगणात ती उभी होती. काळीबाळी, लांब शेपटीची, ठुसकीशी होती. कपाळावर चांद होता. गाय अंगणात आल्याबरोबर तिच्या मस्तकी हळदकुंकू लावलं आणि तिला गोठ्यात नेऊन बांधली. वाड्यातील सारी मंडळी गाईला पाहण्यासाठी जमा झाली होती. आम्ही मुलं सर्वांच्या पुढं उभी होतो.कपाळावर चांद होता म्हणून आम्ही तिला चंद्री म्हणू लागलो.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) गाय कोणी आणली ?
२) गाय कोठे उभी होती ?
३) गाय कशी होती ?
४) गायीचा रंग कोणता होता ?
५) गायीच्या कपाळावर काय होते ?
६) गाय अंगणात आल्याबरोबर तिच्या मस्तकी काय लावले ?
७) गायीला कोठे नेऊन बांधले ?
८) गायीला पाहण्यासाठी कोण जमा झाले ?
९) सर्वांच्या पुढे कोण उभी होती ?
(१०) गायीला सर्वजण चंद्री का म्हणू लागले ?
११) कोणाला बघण्यासाठी वाड्यातील सारी मंडळी जमा झाली ?
(१२) तुला माहित असणारे जोडशब्द लिही. उदा. काळीबाळी
१३) 'मस्तक' या शब्दाला समान तुला माहित असणारे शब्द लिही.
१४) 'अंगणात ती उभी होती' या वाक्यात सर्वनाम कोणते आहे.
१५) 'गाय एक पाळीव प्राणी' या विषयावर पाच शब्द लिही.
१६) 'गाय' या शब्दापासून शब्दडोंगर तयार कर.
१७) शब्दसाखळी पूर्ण कर. गाय-यम-मगर
१८) 'कपाळावर' या शब्दात कोणता खाण्याचा पदार्थ दडलेला आहे?
१९) 'लांब' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिही.
२०) शेवटी 'ळी' येणारे तुला माहीत असलेले आणखी शब्द लिही. उदा. काळी