⚜️दोन हुशार बकऱ्या⚜️
एका मोठ्या नदीवर एक अरुंद पुल होता. त्या पुलावरून एका वेळेस एकाच व्यक्तीला जाण्यापुरतीच जागा होती. एक दिवस एकाच वेळेला दोन बकऱ्या दोन विरुद्ध बाजूंकडून त्या पुलावर आल्या. मध्यभागी समोरासमोर आल्यावर एकमेकीला ओलांडून त्यांना पुढे जाता येईना. कारण रस्ता अरुंद होता. दोघींनाही पुढे जायचे होतं. मग त्यांच्यात भांडण जुंपलं. दोघी एकमेकींना शिंगांनी ढकलायला लागल्या. भांडण विकोपाला गेलं. भांडताना दोघी खाली नदीत पडणार होत्या. पण लवकर त्यांच्या लक्षात आले की, एकमेकात भांडल्यामुळे दोघीही पुलावरून खाली पाण्यात पडून मरून जाऊ. मग भांडण मिटवून मित्रत्वाच्या नात्याने दोघींनी एक युक्ती केली. त्यापैकी एक बकरी पुलावर आडवी झाली. दुसरी बकरी तिच्या अंगावरून चालत पलिकडे गेली. मग पहिली बकरी उठून उभी राहिली आणि आपल्या दिशेने पुढे चालायला लागली. दोघींनी समजूतीने मार्ग काढल्यामुळे दोघींनाही आपला मार्ग मिळाला.
तात्पर्य:- तुमची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो.