⚜️उतारा वाचन भाग १३⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग १३⚜️

  'शब्द' हे संस्कृतीचे प्रतीक आहे. चांगले शब्द है सुसंस्कृत मनाचे लक्षण मानले जाते. अपशब्दांतून संस्कृतिहिनताच व्यक्त होते.शब्दांचे सामर्थ्य हे असे अमर्याद आहे.उत्तम वक्त्याचे शब्द लक्षावधी श्रोत्यांना एकाच वेळी विचारप्रवृत्त कार्यप्रवृत्त करतात, मंत्रमुग्ध करतात. प्रतिभासंपन्न कवीचे शब्द हजारो वर्षे करतात, लोटली तरी टवटवीत राहतात. रसिकांना अक्षय आनंद देतात. एखादे अर्थपूर्ण गीत आपल्याला मंत्रमुग्ध करते. 'चले जाव' हे दोन साधे शब्द; पण त्यांनी कोट्यावधी जनतेला चेतना दिली आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया उखडून टाकला.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) संस्कृतीचे प्रतिक कोण आहेत ?
२) चांगले शब्द हे कशाचे लक्षण मानले जाते ?
३) अपशब्दांतून काय व्यक्त होते ?
४) शब्द हे कशाचे प्रतिक आहे ?
५) कोणाचे सामर्थ्य अमर्याद आहे ?  
६) उत्तम वक्त्याचे शब्द लक्षावधी श्रोत्यांना कसे उपयोगी पडतात ?
७) कोणाचे शब्द हजारो वर्षे लोटली तरी टवटवीत राहतात ?
८) रसिकांना अक्षय आनंद कोण देते ?
९) आपल्याला मंत्रमुग्ध कोण करते ?
(१०) कोट्यावधी जनतेला चेतना कोणत्या शब्दांनी दिली ?
(११) ब्रिटिश साम्राज्याचा पाया कोणत्या शब्दांनी उखडून टाकला ?
(१२) 'टवटवीत' या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
१३) 'अक्षय' या शब्दाचा कोणता अर्थ वरील उताऱ्यात अपेक्षित आहे ?
१४) 'शब्द' हा शब्द असणाऱ्या म्हणी लिहा.
१५) वरील उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421