⚜️फळ⚜️0

 ⚜️फळ⚜️

   फळे हा वनस्पतीचा एक भाग आहे. फुलापासून फळ तयार होते. फळे वेगवेगळ्या आकाराची, गुणधर्मांची असतात. काही फळांत रस असतो. काही फळांत गर असतो. सर्वच फळे आपल्या उपयोगाची असतात, असेही नाही. फळांचा मुख्य उपयोग आपल्याला अन्न म्हणून होतो. फळातील रस किंवा गर जीवनसत्त्वांनी युक्त असतो. फळांच्या रसापासून किंवा गरापासून वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात. काही फळांच्या बियाही आपल्याला अन्न म्हणून उपयोगी पडतात. काही फळांच्या बियांपासून तेल काढले जाते. फळातील बियांपासून नवी रोपेही तयार करता येतात. नारळासारख्या फळावरील तंतुमय धाग्यांपासून दोर, बस्करे तयार केली जातात. काही फळे औषध म्हणूनही वापरली जातात.