⚜️उतारा वाचन भाग १२⚜️
प्रत्येक माणसाच्या जीवनात माती, मायभूमी आणि मातृभाषा या तीन गोष्टींना त्याच्या जन्मदेएवढेच अनन्यसाधारण स्थान आहे. माती त्याला अन्न देते, आधार देते. मातीच्या सानिध्यात त्याला सुरक्षितता लाभते. मायभूमी त्याला आसरा देते. मायभूमीपासून दूर फेकला गेलेला माणूस निराधार होतो, पोरका होतो. मग त्याला परक्या देशात कितीही धन मिळाले, तरी तो तेथे परकाच राहतो. तेथे त्याला आपलेपणा गवसत नाही. मातीचे व मायभूमीचे माणसाला जेवढे महत्त्व असते तेवढे त्याला मातृभाषेचेही महत्त्व असते. कारण मातृभाषा त्याच्यावर सुयोग्य संस्कार करीत असते. मागच्या अनंत पिढ्यांच्या अनुभवांचा वारसा ती त्याच्यासाठी घेऊन येते. या संस्कारातून त्याचे व्यक्तीमत्व संपन्न होते.
खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) प्रत्येक मानसाच्या जीवनात कशाला अनन्यसाधारण स्थान आहे?
२) माती मानवाला काय देते ?
३) कोणाच्या सानिध्यात मानवाला लाभते ?
४) मानवाला आसरा कोण देते ?
५) माणूस निराधार कधी होतो ?
६) माणासाला आपलेपणा ककोठे गावसत नाही ?
७) माती व मायभूमीइतकेच मानवाला कशाचे महत्त्व असते?
८) मानवी जीवनात मातृभाषेचे महत्त्व का आहे ?
९) अनंत पिढ्यांच्या अनुभवांचा वारसा कोण घेऊन येते ?
१०) माणसाचे व्यक्तीमत्व कोणाच्या संस्कारातून संपन्न होते ?
११) वरील उताऱ्यात किती जोडाक्षरे आली आहेत ?
१२) 'पोरका होणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१३) वरील उताऱ्यात आलेली क्रियापदे शोधा.
१४) तुमची मातृभाषा कोणती आहे ?
१५) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?