⚜️उतारा वाचन भाग ६६⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ६६⚜️

  ओहळ खळखळ वाहत होता. त्याचे गोड संगीत सुरु होते. पाखरे गात होती.जलवंतीला वाटले, येथून हलू नये. पण तिला थांबणे शक्य नव्हते. झोपडीत म्हातारी पाण्यावाचून तळमळत होती. नकळत जलवंतीच्या मनात म्हातारीविषयी विचार आला. तिच्याकरिता आपण पाणी नेले पाहिजे, तिला मदत केली पाहिजे. ती संकटात, दुःखात आहे.तिला मदत करणे आपले कर्तव्य आहे असे वाटू लागले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) काय खळखळ वाहत होता ?
२) कोणाचे गोड संगीत सुरु होते ?
३) कोणाला वाटले इथून हलू नये ?
४) कोण झोपडीत पाण्यावाचून तळमळत होते ?
५) जलवंतीच्या मनात म्हातारीविषयी कोणता विचार आला ? 
६) म्हातारी पाण्यावाचून कोठे तळमळत होती ?
७) कोण दुःखात आहे असे जलवंतीला वाटत होते ?
८) कोण खळखळ वाहत होते
९) कोण गात होते ?
१०) पक्षी काय करत होते ?
११) 'नकळत' या शब्दापासून आणखी नवीन शब्द तयार करा.
१२) 'खळखळ' यासारखे आणखी शब्द लिही.9
१३) 'जलवंती' या शब्दात पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे?
१४) 'पक्षी' या शब्दाला आणखी समानार्थी शब्द लिही.
१५) 'तुम्ही दुसऱ्याला कोणकोणत्या प्रसंगी मदत करता' असा एखादा प्रसंग लिही.