⚜️उतारा वाचन भाग १९⚜️
चंदा नावाची एक मुलगी होती. ती नदीच्या काठी खेळत होती. खेळता खेळता तिला तहान लागली. नदी तर आटून गेली होती. तिला वाळूत एक लहान खड्डा दिसला. त्याच्यात थोडे पाणी होते. खड्ड्यातील पाणी ओंजळीत घेऊन ते पिणार एवढ्यात एक ससा तिच्याजवळ आला. तो खूप तहानलेला होता. थकून गेला होता. ते पाहून तिने पाण्याची ओंजळ त्याच्या तोंडाजवळ धरली. सशाने घटाघटा पाणी पिऊन टाकले व आनंदाने उड्या मारत निघून गेला. चंदाला पण खूप आनंद वाटला.
⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) नदीच्या काठी कोण खेळत होते ?
२) मुलीचे नाव काय होते
३) चंदा नदीच्या काठी काय करत होती ?
४) चंदाला वाळूत काय दिसले ?
५) लहान खड्डा कोठे होता ?
६) चंदाजवळ कोणता प्राणी आला ?
७) ससा घटाघटा पाणी का प्यायला ?
८) कोण खूप तहानलेला होता ?
९) घटाघटा पाणी कोण प्याले ?
१०) ससा आनंदाने कोठे निघून गेला ?
११) चंदाने खड्ड्यातील पाणी ओंजळीत का घेतले ?
१२) चंदाला आनंद का झाला ?
१३) 'ती नदीकाठी खेळत होती या वाक्यातील सर्वनाम कोणते आहे ?
१४) घटाघटा पाणी पिणे म्हणजे काय अर्थ होतो?
१५) 'वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?