⚜️उतारा वाचन भाग ४१⚜️
दान करणे म्हणजे अत्यंत निरपेक्ष वृत्तीने एखादी गोष्ट दुसऱ्याला देणे. दानशूरता माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेचा एक विशेष गुण मानला जातो. भारतीयांच्या रक्तातच दान ही संकल्पना मुरलेली आहे. सुखाच्या व दुःखाच्या दोन्ही प्रसंगी दान दिले जाते. सुखाच्या वेळी दान करुन आपण दुसऱ्याला आपल्या आनंदात सहभागी करुन घेतो. दुःखाचे प्रसंगी दान करुन दुःख विसरण्याचा व आत्मिक बल वाढवण्याचा हेतू असतो, थोडक्यात दानातून माणसाच्या मनाचे उदात्तीकरण होते.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) दान करणे म्हणजे काय ?
२) माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेचा विशेष गुण कोणता
?
३) कोणाच्या रक्तातच दान हि संकल्पना मुरलेली आहे ?
४) दान कोणत्या प्रसंगी केले जाते ?
५) आपण दुसऱ्याला आपल्या आनंदात कधी सहभागी करून घेतो ?
६) दुःखाच्या प्रसंगी दान का केले जाते ?
७) दानातून कशाचे उदात्तीकरण होते ?
८) दानशूरता कोणाचा विशेष गुण मानला जातो ?
९) वरील उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द सांगा.
१०) तुम्हांला आवडणाऱ्या चांगल्या सवयी कोणत्या ?