⚜️उतारा वाचन भाग ६२⚜️
एक मुलगा एका कुरणात मेंढरे चारीत असे. जवळ शेतात शेतकरी आपले काम करीत असत. या कामकरी लोकांना फसविण्यासाठी तो लबाड मुलगा दररोज उगीच ओरडत असे, 'वाघ आला रे वाघ !' मुलाची अशी आरोळी ऐकून बिचारे शेतकरी धावून येत. वाघबिघ काही नाही असे पाहून परत जात; पण पुढे मुलाची आरोळी ऐकून ते येईनासे झाले.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) मुलगा मेंढरे कोठे चारत असे ?
२) जवळच्या शेतात कोण काम करत होते ?
३) लोकांना फसविण्यासाठी मुलगा काय करत असत ?
४) मुलाची कोणती आरोळी ऐकून शेतकरी धावून येत असे ?
५) शेतकरी का परत जात असत ?
६) शेतकरी मुलाची आरोळी ऐकून का येईनासे झाले ?
७) कुरणात मेंढ्यांना घेऊन कोण येत असे ?
८) शेतकरी कोठे काम करीत असत ?
९) मुलातील कोणता दुर्गुण या उताऱ्यात सांगितला आहे ? १०) शेवटी 'री' अक्षर असणारे तुला माहित असलेले शब्द लिही. उदा. शेतकरी
११) 'कुरण' या शब्दाला तुला माहित असलेले आणखी शब्द लिही.
१२) 'मेंढरू' या शब्दासाठी अनेकवचनी शब्द लिही.
१३) शेवटी ' ळी येणारे शब्द लिही.
१४) वरील उताऱ्यात कोणत्या प्राण्यांची नावे आली आहेत ?
१५) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?