⚜️उतारा वाचन भाग ४७⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ४७⚜️

  साक्षरता हे स्वतंत्रपणे माहिती मिळविण्याचे साधन आहे. ते परस्परसंपर्काचे साधन आहे. स्रीया साक्षर झाल्या, तर त्यांचे मनोधैर्य वाढेल. आपल्या वर कोणत्या बाबतीत अन्याय होतो, तो का होतो, आणि त्याचे निवारण कसे करता येईल, हे समजून घेऊन अन्याय निवारण्याची कृती करण्याचे धैर्य त्यांना लाभेल. साक्षरता हे प्रत्येक व्यक्तीच्या जागृतीचे, सामर्थ्याचे आणि जीवन कौशल्यांचे साधन आहे.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) स्वतंत्रपणे माहिती मिळविण्याचे साधन कोणते ?
२) परस्परसंपर्काचे साधन कोणते ?
३) साक्षरता कशाचे साधन आहे?
४) कोण साक्षर झाल्या तर त्याचे मनोधैर्य वाढेल
५) त्रिया साक्षर झाल्या तर काय होईल ?
६) व्यक्तीच्या सामर्थ्याचे, जीवनकौशल्याचे साधन कोणते ? 
७) 'साक्षरता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
८) 'साक्षरते' वर आधारीत घोषवाक्य लिहा.
९) वरील उतारा सुंदर हस्ताक्षरात लिहा.
१०) वरील उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.