⚜️फुले⚜️

 ⚜️फुले⚜️

 जवळपास प्रत्येक झाडाला फुले येतात. प्रत्येक झाडाचे फूल असते. वेगळे फुलाचा आकार, रंग, गंध असे फरक प्रत्येक फुलात आढळतात. काही फुले पांढऱ्या रंगाचीही असतात. काही वनस्पतींची फुले इतर फुलांप्रमाणे दिसतही नाहीत. जास्वंद, चाफा, कर्दळ, गुलाब, कमळ, शेवंती, झेंडू अशी कितीतरी रंगीत फुले आहेत. जास्वंद, चाफा, गुलाब, झेंडू अशा फुलांत वेगवेगळ्या रंगांच्या फुले येणाऱ्या वनस्पती आढळतात. पिवळी, केशरी, लाल, पांढरी अशी फुले येणाऱ्या जाती जास्वंद या फुलाच्या आढळतात. गुलाबाची फुलेही अनेक वेगवेगळ्या रंगांची आढळतात. काही रंगीत फुले सुगंधी असतात, तर काहींना अजिबात गंध नसतो.