⚜️घोडा⚜️
घोडा हा पाळीव प्राणी आहे. घोडा वाऱ्याच्या वेगाने पळू शकतो. घोड्याच्या मानेवर केस असतात. घोड्याला शेपूटही असते. घोडा लहान असताना त्याला 'शिंगरू' असे म्हणतात. घोडा गवत खातो. हरभरे हे त्याचे आवडते खाद्य आहे. त्याच्या ओरडण्याला खिंकाळणे असे म्हणतात. फार पूर्वीपासून घोड्याचा उपयोग प्रवासासाठी, गाड्या ओढण्यासाठी केला जातो. घोड्याच्या निवाऱ्याला तबेला असे म्हणतात. सध्या घोडे फारसे पाळले जात नाहीत. घोडा हा विश्वासू प्राणी आहे. घोड्याला अश्व, वारू अशीही नावे आहेत.