⚜️उतारा वाचन भाग ३६⚜️
एक होता सदू. त्याच्याकडे एक गाढव आणि एक घोडा होता. तो गावोगावी जाऊन माल विकायचा. एकदा सदू माल विकायला निघाला. त्याने दोघांच्या पाठीवर माल ठेवला. घोडा, गाढव पुढे निघाले. सदू मागून निघाला. रस्त्यात ठेच लागून गाढव पडले. धडपडत उठले. घोड्यामागून हळूहळू चालू लागले. त्याने घोड्याला थोडे पाठीवरचे ओझे घेण्याची विनवणी केली. घोड्याने गाढवाला नकार दिला. गाढव हळूहळू चालू लागले. दमून गेले. खाली बसले. मागून त्याचा मालक सदू आला. सदूने गाढवाच्या पाठिवरील सगळे ओझे काढले. गाढव धडपडत उठले. सदूने गाढवाच्या पाठिवरील ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर ठेवले. आता घोडा - गाढव हळूहळू चालू लागले. ओझ्याने घोडाही दमून गेला. घोड्याने गाढवाचे म्हणणे ऐकले असते तर घोड्यावर हि वेळ आली नसती.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) सदू कोठे निघाला होता ?
२) सदूकडे कोणते दोन प्राणी होते ?
३) सदू प्राण्यांचा कशासाठी उपयोग करायचा ?
४) गाढव का पडले ?
५) पडल्यावर गाढवाने कोणाला विनवणी केली ?
६) घोड्याने गाढवाचे म्हणणे ऐकले का ?
७) सदूने गाढवाच्या पाठिवरचे ओझे घोड्याच्या पाठिवर का ठेवले ?
८) उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.
९) तूम्हांला आवडणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.
१०) या गोष्टीला तुम्ही काय नाव दयाल.
११) पाळीव प्राण्यांची नावे लिहा.
१२) घोडा आणि गाढव यांचा संवाद तयार करा.