⚜️उतारा वाचन भाग ६१⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ६१⚜️

      एक गाव होते. त्या गावात रामूशेठ नावाचा एक व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. तो परगावी सामान विकत घेई व गाढवावर लादून आपल्या घरी आणी. एकदा तो गाढवावर मिठाची गोणी लादून घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला व तो नदीच्या पाण्यात पडला. मिठाच्या गोणीत पाणी शिरले, बरेच मीठ विरघळून गेले. यामूळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) व्यापाऱ्याचे काय नाव होते ?
२) रामूशेठजवळ कोणता प्राणी होता ?
३) रामूशेठ काय काम करत असे ? 
४) रामूशेठ कशाची गोणी गाढवावर लादून घरी आणीत होता ?
५) वाटेत एक काय होती ?
६) गाढवाचा पाय केंव्हा घसरला ? 
७) गाढव कसे पडले ?
८) गाढव कुठे पडले ?
९) मिठाच्या गोणीत काय शिरले ?
१०) मीठ का विरघळले ?
११) गाढवाचे ओझे हलके कशामूळे झाले ?
१२) घरी मिठात पाणी टाकून काय होते ते बघा. पाण्यात अजून काय काय विरघळते ते सांग.
१३) वरील उताऱ्यात कोणती सर्वनामे आली आहेत ?
१४) 'जड' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उताऱ्यातून शोधून लिही.
१५) या गोष्टीला अनुरूप असे चित्र काढ.