⚜️वृक्ष⚜️
वृक्ष परोपकारी असतात. स्वतः उन्हात उभे राहून इतरांना थंडगार सावली देतात. आपल्याला चवदार फळे, सुवासिक फुले देतात. औषधी पदार्थ देतात. सृष्टीचे सौंदर्य खुलवतात. झाडांमुळे जमिनीची धूप थांबते. वृक्षांच्या या गुणांमुळे ते सर्वत्र पुजले जातात. परोपकार, त्याग यांची शिकवण देणाऱ्या झाडांची आपण काळजी घेतली पाहिजे. झाडे लावली पाहिजेत, वाढवली पाहिजेत.