⚜️उतारा वाचन भाग १६⚜️
हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले, ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदीफांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लालचुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारु लागली.वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
(१) कोणता ऋतू संपला होता ?
(२) काय तापू लागले ?
(३) फांदीवर कसे अंकूर दिसू लागले ?
(४) कोण हळूहळू मोठे होत गेले ?
(५) पाने कशी दिसू लागली ?
(६) फांदीफांदीवर कसे ठिपके दिसू लागले ?
(७) वडेशची फळे कोणत्या रंगांची झाली?
(८) जाता येता पाखरांना काय दिसू लागली ?
(९) पाखरे शीळ घालून कोणाला हाका मारु लागली ?
(१०) वडेशला कोणाची ओढ होती ?
(११) कोणाचा रुसवा संपला होता?
(१२) वडेशला शीळ घालून कोण हाका मारु लागली ?
(१३) वरील उताऱ्यात कोणकोणत्या रंगांची नावे आली आहेत ?
(१४) 'हळूहळू' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
(१५) 'पान' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
(१६) 'ते हळूहळू लालसर झाले या वाक्यातील सर्वनाम सांगा.
(१७) 'शीळ घालणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१८) 'रुसणे' या शब्दांसाठी कोणता शब्द वरील उताऱ्यात आला आहे.
(१९) 'पाखरु'या शब्दाला आणखी कोणते समानार्थी शब्द आहेत.
(२०) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421