⚜️उतारा वाचन भाग २६ ⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग २६ ⚜️

    चंपकने हिराबागेजवळ गाडी उभी केली. पिवळीधमक,गोड केळी लोकांना आवडू लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली, केळी खाऊन साल सडकेवर टाकली.‍ . मागून आलेले आजोबा सालीवरुन घसरले, पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला. आजोबांना बाजूला नेऊन बसवले, पाणी दिले. चूक मुलाने केली; पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. आजोबांनी शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागली. नगरपालिकेची कचरागाडी कचरा नेऊ लागली. सड़क साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला. 

⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) चंपकने केळीची गाडी कोठे लावली ?
२) केळी कशी होती ?
३) मुलाने केळीचे साल कोठे टाकली ?
४) केळीच्या सालीवरुन कोण घसरले ?
५) आजोबांच्या मदतीला कोण धावले ?
६) आजोबांना पाणी कोणी दिले ?
७) चंपकने आजोबांची माफी का मागितली ?
८) चंपकला शाबासकी कोणी दिली ?
९) चंपकने गाडीजवळ काय ठेवले ?
१०) लोकांनी कचराकुंडीचा उपयोग कशासाठी केला ?
११) कचरा कोण नेऊ लागले ?
१२) चंपकला आनंद का झाला ?
१३) शेवटी 'ले' आलेले वरील उताऱ्यातील शब्द सांगा.
१४) 'माफी मागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१५) 'आजोबांनी शाबासकी दिली.' या वाक्यातील क्रियापद सांगा.