⚜️उतारा वाचन भाग २८⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग २८⚜️

   सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला, "चला, चला फुलांचा राजा आला. चला स्वागताला.” सगळी फुले सावध झाली. आपपल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल, टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान गाणे म्हटले. झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी नाच करुन दाखवला. निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. जाई-जुई बाजूला उभ्या राहिल्या.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) फुलपाखरांना कोणी आमंत्रित केले होते ?
२) संदेश कोणी आणला ?
३) सगळी फुले सावध का झाली ?
४) सावध झाल्यानंतर फुले कशी उभी राहिली ?
५) गुलाबराजे कोठे बसले ?
६) छान गाणे कोणी म्हटले ?
७) गोष्ट कोणी सांगितली ?
८) फुलपाखरांनी काय करुन दाखवले ?
९) गुलाबरावांचे स्वागत कोणी केले ?
१०) कोण बाजूला उभ्या राहिल्या ?
११) या उताऱ्यात आलेल्या फुलांची नावे सांगा.
१२) फुलांचा राजा कोण आहे ?
१३) तुम्हांला आवडणाऱ्या फुलाचे चित्र काढा.