⚜️उतारा वाचन भाग ४⚜️
भारतीय शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. आपण शेतकऱ्यांची सुखदुःखे समजून घेऊन त्यांना समाधानी ठेवले पाहिजे, हे जनतेचे आद्यकर्तव्य आहे. शेतकऱ्यांना विशेष सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. योग्य वेळी कर्जपुरवठा, बी-बियाणे, खते, जंतुनाशके, पाणी इत्यादी शेतीस अत्यावश्यक बाबींचा पुरवठा झाला पाहिजे. 'गृहिणी गृहम उच्यते' प्रमाणे 'कृषीवले राष्ट्रम् उच्यते' म्हणणे उचित ठरेल. कारण या भूमीपुत्रांमुळेच देशाचा विकास होतो. जवान आणि किसान ही भारतीय प्रगतीच्या रथाची दोन चाके आहेत. त्यांच्या जोरावरच भारत प्रचंड वेगाने प्रगतिपथावर जाऊन विश्वात अग्रेसर ठरणार आहे.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) लाखांचा पोशिंदा कोण आहे ?
२) जनतेचे आद्यकर्तव्य कोणते ?
३) शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती दिल्या गेल्या पाहिजेत ?
४) शेतकऱ्यांच्या बाबतीत काय म्हणणे उचित ठरेल ?
५) देशाचा विकास कोणामुळे होतो ?
६) भारतीय प्रगतीच्या रथाची दोन चाके कोणती आहेत ?
७) कोणाच्या जोरावर भारत विश्वात अग्रेसर ठरणार आहे ?
८) पोशिंदा या शब्दाचा अर्थ काय आहे ?
९) 'उचित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
(१०) या उताऱ्यात आलेली जोडाक्षरे लिहा.
११) तुमच्या आजुबाजूला असलेल्या एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घ्या ?
१२) शेती करण्यासाठी कशाकशाची आवश्यकता असते ?
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421