⚜️हुशार बिरबल⚜️
बिरबलाच्या तर आपण खूप गोष्टी ऐकल्या असतील. अकबर आणि बिरबल यांचे खूप किस्से प्रसिद्ध आहेत. अकबर राजा होता आणि बिरबल हा त्याच्या दरबारात हुशार म्हणनू खपू प्रसिद्ध होता.
अकबर बादशहाला नेहमी आपल्या बिरबलाची परीक्षा घ्यायला खपू आवडायचे. एकदा नदी किनारी फिरताना बादशाहने वाळूमध्ये एक रेघ मारली आणि बिरबलाला म्हंटले माझ्या रेघेला कमी-जास्त न करता तू लहान करून दाखव?
अर्थात बिरबल हा हुशार होताच त्याने अकबर बादशहाच्या रेघेसमोर एक मोठी रेघ मारली. त्याबरोबर बादशहाची रेघ ही लहान झाली. बादशहाने बिरबलचे पुन्हा एकदा खूप कौतकु केले.
तात्पर्य:- प्रतिस्पर्ध्याच्या कार्याशी तुलना न करता आपण आपले कार्य करत राहावे.