⚜️उतारा वाचन भाग ६ ⚜️

⚜️उतारा वाचन भाग ६ ⚜️

   एका तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला. ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) एका तळ्यात किती बेडूक होते?
२) दोन बेडूक कोठे रहात होते?
३) बेडकांना पाण्यात काय दिसले ?
४) बेडकांनी काय आणून खांबांना बांधले?
५) बेडकांना दोन खांब कोठे दिसले ? 
६) कशाचा छानदार झोपाळा तयार झाला ?
७) बेडकांनी वेल आणून कशाला बांधली ?
८) बेडूक कशावर बसून झोके घेऊ लागले ?
९) वरील उताऱ्यात काय गंमत झाली आहे?
१०) बेडकांनी पाण्यात पटापट उड्या का घेतल्या ? 
(११) वरील उताऱ्यात कोणता प्राणी आला आहे?
१२) वरील उताऱ्यात आलेल्या पक्ष्याचे नाव सांगा.
(१३) तुम्हांला माहित असलेले पाण्यात राहणारे सजीव सांगा.
१४) वरील उताऱ्याला एक छान शिर्षक द्या.
१५) एक छानसे बेडकाचे चित्र काढा.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421