⚜️उतारा वाचन भाग ५९⚜️
ते सुगीचे दिवस होते. शरद आपल्या आजोळी खेडेगावात आला होता. शरद आपल्या आजोबांबरोबर शेतावर गेला. शेतात ज्वारीची कापणी सुरु होती. आजोबा आल्याआल्या कामाला लागले. शरद झाडाच्या सावलीत बसला.शेतातील कामे पाहू लागला. दुपार झाली. काम थांबवून आजोबा शरदकडे आले. विहिरीवर जाऊन दोघांनीही हातपाय धुतले. झाडाच्या सावलीत जेवायला बसले.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) शरद कोठे गेला होता ?
२) शरद कोणाबरोबर शेतातर गेला ?
३) ज्वारीची कापणी कोठे सुरु होती ?
४) कोण लगेच कामाला लागले ?
५) शरद कोठे बसला ?
६) शरद झाडाखाली बसून काय पाहू लागला ?
७) काम थांबवून कोण शरदकडे आले ?
८) शरद व आजोबांनी कोठे हातपाय धुतले ?
९) आजोबा व शरद कोठे जेवायाला बसले ?
१०) 'आजोळ' या शब्दाचा अर्थ सांग.
११) शेतात कशाची कापणी सुरु होती ?
१२) वरील उताऱ्यात कोणत्या मुलाचे नाव आले आहे ?