⚜️उतारा वाचन भाग ११⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ११⚜️


   आजच्या मानवी जीवनात वर्तमानपत्राला विलक्षण महत्त्व आहे. काव्य, शास्र, विनोद ही बुद्धीमंतांच्या मनोरंजनाची साधने वृत्तपत्रे या तिन्ही बाबतीत वाचकांची भूक भागविते. वर्तमानपत्राचे आयुष्य हे तसे फार अल्प असते. पण त्या अल्पायुषातील त्याची कामगिरी मात्र लक्षणीय व नेत्रदीपक असते. सकाळचे वर्तमानपत्र हे संध्याकाळी शिळे होते पण तेवढ्या काळातील ते विलक्षण चमत्कार करून जाते.कारण लाखो लोकांनी तेवढ्या काळात त्याचे पारायण केलेले असते. वर्तमानपत्र वाचनाने वाचकांत बहुश्रुतता येते. वर्तमानपत्र हे बहुविध प्रकारची माहिती देत असते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) आजच्या मानवी जीवनात कशाचे महत्त्व विलक्षण असते?
२) बुद्धीवंतांच्या मनोरंजनाची कोणती साधने आहेत ?
३) वाचकांची भूक कोण भागवते ?
४) कोणाचे आयुष्य फार अल्प असते? 
५) 'अल्प' या शब्दाचा अर्थ काय आहे ?
६) कोणाची कामगिरी फार लक्षणीय व नेत्रदीपक असते?
७) कोण विलक्षण चमत्कार करुन जाते ? 
८) वर्तमानपत्र विलक्षण चमत्कार कसे करुन जाते?
९) वाचकांत बहुश्रुतता कोणामूळे येते?
१०) बहुविध प्रकारची माहिती कोणामूळे मिळते ?
११) वरील उताऱ्यात 'वर्तमानपत्र' हा शब्द किती वेळा आला आहे? 
१२) वर्तमानपत्राचे फायदे सांगा.
१३) तुम्हांला माहित असलेल्या वर्तमानपत्राची नावांची यादी करा.
१४) 'अल्प' या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
१५) 'वर्तमानपत्राचे आयुष्य हे फार अल्प असते.' या वाक्यातील क्रियापद कोणते आहे ?

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421