⚜️उतारा वाचन भाग ५८⚜️
प्रत्येक प्राण्याला पाच इंद्रिये आहेत. डोळा हे इंद्रिय पाहण्यासाठी, कान हे इंद्रीय ऐकण्यासाठी, नाक वास घेण्यासाठी व जीभ चव घेण्यासाठी. स्पर्शाचे इंद्रिय हे पाचवे इंद्रिय. हाताला, पायाला, सर्वांगाला स्पर्शाचे ज्ञान होते. बुद्धी व वाणीचा उपयोग करुन माणूस या पाच इंद्रियांच्या साहाय्याने शिकतो.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) प्रत्येक प्राण्यांला किती इंद्रिये आहेत ?
२) कोणत्या इंद्रियाचा वापर पाहण्यासाठी होतो ?
३) कानाचा उपयोग कशासाठी होतो ?
४) वास घेण्यासाठी कोणते इंद्रिय वापरतो ?
५) चव घेण्यासाठी कोणते इंद्रिय उपयोगी पडते ?
६) आपले पाचवे इंद्रिय कोणते ?
७) स्पर्शाचे ज्ञान कोठे कोठे
८) माणूस कसा शिकतो ?
९) ज्ञान मिळवण्याच्या पाच इंद्रियांची नावे सांगा.
१०) प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्य लिही.
११) वरील उताऱ्यातील जोडाक्षरे लिही.
१२) ज्ञानेंद्रियाची चित्रे वहीत काढ.
१३) 'चिंच आंबट आहे' हे आपणास कोणत्या इंद्रीयामुळे कळते ?
१५) आपणास वेगवेगळे आवाज या इंद्रीयामुळे कळतात.
१४) आपल्याला सर्वात जास्त ज्ञान कोणत्या इंद्रीयामुळे भेटते ?