⚜️लबाड कोल्हा⚜️
दुपार झाली होती. एक कोल्हा रस्त्यातनू इकडे तिकडे पाहत फिरत होता त्याला सकाळपासनू काहीही खायला मिळाले नव्हते. तो उपाशी होता. काही मिळत आहे का ते शोधत होता तो भकुठेला असला तरी खपूच स्वार्थी आणि लबाड होता.
अचानक त्याचे लक्ष एका झाडावर बसलेल्या कावळ्याकडे गेले त्या कावळ्याच्या तोंडात एक माशाचा तुकडा होता. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याला कसेही करून त्या कावळ्याच्या तोंडातील माझा खावयाचा होता. तो विचार करू लागला.
कोल्ह्याने कावळ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. कावळोबा कावळोबा तुझा आवाज किती गोड आहे, तू किती छान गातोस, मला एक गाणं गाऊन दाखवतोस का? कावळा खुश झाला, कारण त्याचा आवाज एकदमच बेसूर होता.
तो गालातल्या गालात हसला आणि गाणे म्हणू लागला जसे त्याने गाणे म्हणायला आपली चोच उघडली, तसा त्याच्या तोंडातला माशाचा तुकडा खाली पडला, आणि लबाड कोल्हा तो तुकडा घेऊन पळून गेला.
तात्पर्य:- स्वतःचे गुण आणि दोष आपण ओळखले पाहिजेत.