⚜️ उतारा वाचन भाग ७⚜️

 ⚜️ उतारा वाचन भाग ७⚜️

  दिनू शाळेतून घरी निघाला होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते. थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली. आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते. दिनूला त्याची गंमत वाटली.


⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.


१) दिनू शाळेतून कोठे निघाला होता?
२) आकाशात काय जमा झाले होते ?
३) कोण शाळेतून घरी निघाले होते ?
४) काळे ढग कोठे जमा झाले होते ? 
५) थोड्या वेळात कशाला सुरुवात झाली ?
६) आकाशातून काय खाली येत होते ?
७) दिनूला कशाची गंमत वाटली?
८) पाण्याचे थेंब कोठून खाली येत होते ?
९) 'ढग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
१०) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?
११) 'पाऊस' या विषयावर पाच वाक्ये लिहा.
१२) पावसाचे फायदे सांगा.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421