⚜️ उतारा वाचन भाग ४३⚜️
स्वच्छता हि आपली सखी आहे.कारण स्वच्छतेवर आपले सुख अवलंबून असते. लहानपणापासून आपल्यावर स्वच्छतेचे संस्कार केले जातात, आपले शरीर स्वच्छ कसे ठेवावे हे आपल्याला शिकवले जाते. स्वच्छता न पाळल्यामुळे होणारे धोकेही आपल्याला सांगितले जातात. जे स्वच्छता पाळत नाहीत, त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते. दात नीट न घासणाऱ्याचे दात किडतात आणि दाढदुखीच्या वेदना सहन कराव्या लागतात. रोजच्या रोज अंघोळ न करणाऱ्याला खरुज किंवा इतर त्वचारोग होतात. हातपाय वेळोवेळी न धुता वाटेल ते खणाऱ्याला अनेक आजारांना तोंड दयावे लागते. हे ओळखून लोक आपले शरीर, आपले केस, कपडे व घर स्वच्छ ठेवतात.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) आपली सखी कोण आहे ?
२) स्वच्छता हि आपली सखी का आहे ?
३) लहानपणापासून आपल्यावर कोणते स्कार केले जातात.?
४) आपल्याला काय शिकवले जाते ?
५) वैयक्तिक स्वच्छता न पाळणाऱ्याला त्यांना काय भोगावे लागते ?
६) दात कोणाचे किडतात ?
७) दाढदुखीच्या वेदना का सहन कराव्या लागतात ?
८) रोज अंघोळ केली नाहीतर काय होते ?
९) त्वचारोग कोणाला होतात ?
१०) अनेक आजारांना कोणाला तोंड दयावे लागते ?
११) लोक वैयक्तिक स्वच्छता का करतात ?
१२) स्वच्छतेचे तुम्हांला माहित असलेले फायदे सांगा.
१३) विरुद्धार्थी शब्द सांगा. स्वच्छ -
१४) स्वच्छता हा शब्द वरील उताऱ्यात किती वेळा आला आहे ?
१५) स्वच्छतेच्या कोणत्याही पाच चांगल्या सवयी सांगा.