⚜️उतारा वाचन भाग ४४⚜️
वृक्षांमुळे अनेक प्रकारची फळे मिळतात. काही वनस्पती औषधीही असतात. वनस्पतींचा उपयोग कागद करण्यासाठी होतो. त्याप्रमाणे कोळसे तयार करण्यासाठीही करतात. टोलेजंग इमारतींसाठी वृक्ष तोडले जातात. इमारती आणि घरातील फर्निचर बनवण्यासाठी वृक्षांची तोड होतच असतेच. वृक्ष स्वतः अशुद्ध कार्बन वायू घेऊन माणसांना शुद्ध प्राणवायू देतात. वृक्षांमुळे जमिनीची धूप थांबते. वृक्षांमुळे पाऊस पडतो. इतकेच काय, प्रदूषण टाळून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठीच वृक्षच मदत करतात. असे आहेत हे परोपकारी वृक्ष !
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) वृक्षांमूळे आपल्याला काय मिळते ?
२) वनस्पतींचा उपयोग कशासाठी होतो ?
३) वृक्ष का तोडले जातात ?
४) वृक्ष कोणता वायू आपल्याला देतात.
५) वृक्ष कोणता वायू स्वतः शोषून घेतात ?
६) पर्यावरणाचा समतोल कोणामूळे साधला जातो ?
७) वृक्षांना परोपकारी वृक्ष का म्हटले जाते ?
८) 'वृक्ष' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
९) 'वृक्ष आपले मित्र' यावर पाच ओळी माहिती लिहा.
१०) तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वृक्षांची नावे सांग.