⚜️उतारा वाचन भाग ५२⚜️
गजाने आज शाळेत खूप सारे रंगीत कागद आणले. ते कागद त्याने राम, ना आणि शालूला दिले. मग ते सगळेजण शाळेमागे गेले. लीनाने कागदाची होडी तयार केली. होडी तलावात सोडली. होडी तलावात लाटांवर हलत - डुलत फिरु लागली. अचानक एका बेडकाने होडीत उडी मारली. मग काय ! होडी पाण्याने भरली आणि बुडून तळाला गेली.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) गजाने शाळेत काय आणले होते ?
२) गजाने कागद कोणाला दिले ?
३) होडी कोणी तयार केली ?
४) लीनाने होडी कुठे सोडली ?
५) होडी तलावात कशी फिरू लागली ?
६) होडीत कोणी उडी मारली ?
७) होडी का बुडाली ?
८) रंगीत कागद कोणी आणले होते ?
९) गजाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे सांग.
१०) लीनाने काय तयार केले ?
११) तुला कागदी होडी तयार करता येते का ?
१२) होडी या शब्दाशी संबंधित तुला माहित असलेले आणखी शब्द सांग.
१३) उताऱ्यात कोणकोणती विरामचिन्हे आलेली आहेत ?
१४) एक कागदी नाव बनव. व ती कशी तयार केली याची कृती वहीत लिही.
१५) उताऱ्यातील कानायुक्त शब्द वहीत लिही.