⚜️उतारा वाचन भाग १०⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग १०⚜️

   चळवळीत ते अग्रेसर होते. त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन करुन सिंगापूर येथे सुभाषबाबूंनी इंग्रज सरकारला अनेक हादरे दिले. १९४२ च्या चले जाव च्या आझाद हिंद सरकारची स्थापना केली. 'जय हिंद' ची घोषणा दिली. आपल्या सैन्याला 'चलो दिल्ली'चा आदेश दिला. 'कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा!' या त्यांच्या रणगीताने दाही दिशा निनादल्या, असे होते सुभाषचंद्र बोस !

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) इंग्रज सरकारला कोणी हादरे दिली ?
२) १९४२ ला कोणती चळवळ सुरु झाली ? 
३) सुभाषबाबूंनी कोणाला हादरे दिले ?
४) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या सेनेची स्थापना केली ? 
५) सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार कोठे स्थापन केले ?
६) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
७) सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा दिली ?
८) सैन्याला 'चलो दिल्लीचा आदेश कोणी दिला ? 
९) आझाद हिंद सेनेचे रणगीत कोणते होते ?
(१०) 'आदेश देणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
११) 'हादरे देणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
१२) 'युद्ध' या शब्दाला कोणता समानार्थी शब्द वरील उताऱ्यात आला आहे ?
(१३) वरील उताऱ्यात आलेले जोडाक्षरे लिहा.
१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तुम्हांला माहित असलेल्या महान व्यक्तींची नावे लिहा.
१५) देशभक्तीपर तुम्हांला आवडणारे एखादे गीत वहित लिहा.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421